Bhimrao Dhonde On Suresh Dhas : माजी आमदार धोंडेंनी 'टायमिंग' साधलं; सुरेश धसांच्या 'खोक्या'च्या बेकायदेशीर सावकारकीची केली 'पोलखोल' (VIDEO)

Ex MLA Bhimrao Dhonde allegations Satish Bhosale Beed BJP MLA Suresh Dhas illegal money lending : बीड भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय सतीश भोसले याच्या बेकायदेशीर सावकारकीबाबत माजी आमदार भीमराव धोंडे यांचे गंभीर आरोप केले.
Bhimrao Dhonde
Bhimrao DhondeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra political controversy : बीडमधील संतोष देशमुख हत्येतील संशयित आरोपी वाल्मिक कराड याच्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील नेते धनंजय मुंडे यांना घेरणारे, भाजप आमदार सुरेश धस यांच्या अडचणी त्यांचा निकटवर्तीय सतीश भोसले ऊर्फ 'खोक्या' याच्या कारनाम्यामुळे वाढल्या आहेत.

माजी आमदार भीमराव धोंडे यांनी 'टायमिंग' साधत सतीश भोसले याच्या करारनाम्याची जंत्रीच मांडली आहे. सतीश भोसलेची दहशत सांगताना, टोळी येऊन मारहाण करणे, दहशत पसरवणे, अपहरण, सावकारकी, पैशाच्या व्यवहारातून वेठीस धरणे, असे सर्व प्रकार धोंडे यांनी सांगून आमदार धस (Suresh Dhas) यांच्या अडचणी वाढवल्या आहेत.

माजी आमदार भीमराव धोंडे यांनी शिरूरच्या बावी इथं येत ढाकणे पिता-पुत्रांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, सतीश भोसले ऊर्फ 'खोक्या'ची आणि त्याच्या गँगच्या असलेल्या दहशतीवर प्रतिक्रिया दिली. यावेळी सतीश भोसले याच्या बेकायदेशीर सावकारकीवरून घडलेल्या घटनांचा क्रम सांगितला.

Bhimrao Dhonde
Satish Bhosale hunting case: अबब! 200 च्यांवर शिकारी, 'खोक्या'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार? पोलिसांपाठोपाठ वनविभागानंही पावलं उचलली

भीमराव धोंडे म्हणाले, "कातकडे कुटुंबांने सतीश ऊर्फ खोक्याकडून 50 हजार रुपये घेतले होते. त्या बदल्यात तो पाच लाख रुपये मागतो आहे. ज्या मुलाला पैसे दिले, तो मुलगा बेपत्ता आहे. पण त्याला सतीश भोसले याने पैशासाठी पकडून ठेवले आहे. या प्रकारबाबत कातकडे कुटुंबियांनी शिरूर पोलिसांकडे (Police) तक्रार केली आहे. पण त्याची दखल घेतलेली नाही". मोठ्या प्रमाणात सावकारकी चालते. दोन लाखांचा 18 लाख, अशा सावकारकीवर गुन्हा दाखल झालेला नाही. पीडितांनी आता पुढे येऊन पोलिसांकडे तक्रारी केल्या पाहिजेत. पोलिसांनी पीडितांना सहकार्य करावे. पोलिसांनी याची दखल न घेतल्या मोठं आंदोलन करून, असा इशारा दिला आहे.

Bhimrao Dhonde
Dhananjay Munde resignation : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून गोंधळ; सत्ताधाऱ्यांवर हक्कभंगाचा आरोपानंतर विरोधकांचा सभात्याग

सुरेश धसाचा कार्यकर्ता असला, तरी त्यांनी असे काही प्रकार करायला सांगितले नसेल. पण सुरेश धसांचे अनेक कार्यकर्ते, असे प्रकार करतात. बऱ्याच गावात दडपशाही आहे. धस यांच्या आष्टीमध्ये बंडू धोंडे नावाच्या व्यक्तीचे दीड लाखांचे 70 लाख झाले आहे. बंडू धोंडे यांनी स्वतः पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे. पण कारवाईच झालेली नाही. पोलिसांनी सतीश भोसले आणि त्याच्या गँगवर आता मकोका लावला पाहिजे, अशी मागणी भीमराव धोंडे यांनी केली.

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

आष्टी, पाटोद्यामधील बेकायदेशीर सावकारकीला बळी पडलेल्यांची यादी माझ्याकडे आहे. शिरूरमधील लोकांनी त्यांची यादी मला द्यावी. मी मुख्यमंत्र्यांना लवकरच याबाबत भेटणार आहे. यासाठी एक शिष्टमंडळ तयार करून भेटणार असल्याचे भीमराव धोंडे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com