Mumbai, 10 February : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जोरकसपणे बोलताना दिसत आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलिनीकरणाचा विषय आमच्या अजेंडावर नव्हता, असे सांगत आहेत. त्यातच मुख्यमंत्र्यांनी तसं काही असतं तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, असे म्हटल्याने वाद वाढला होता. त्यांना खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवारांनी उत्तर दिले होते. त्यानंतर आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अजून ती वेळच आली नाही, रोज पतंग कशारिता उडवायाचे?’ असे भाष्य केले आहे.
राज्यातील १२ जिल्हा परिषदेच्या आणि १२५ पंचायत समितीच्या निकालानंतर आज (ता. १० फेब्रुवारी) मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रथमच उपस्थित होत्या. त्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्यावर प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजितदादांच्या निधनानंतरची मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज झाली. या बैठकीत अजितदादांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मंत्रिमंडळाने मान्य केलेला आहे. सुनेत्राताई पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून पहिलीच मंत्रिमंडळ बैठक होती. पण दुखवटा असल्याने आम्ही फक्त शब्दसुमनांनी त्यांचे स्वागत केले.
सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भविष्यात चांगलं काम करेल. जिल्हा परिषदेच्या कालच्या निवडणुकीतही त्यांचा चांगला परफार्मन्स राहिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाचा विषय हा त्यांच्या पक्षांचा अंतर्गत विषय आहे. त्या विषयावर मी बोलणं योग्य होणार नाही. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यासंदर्भात बोलेल, असे फडणवीस यांनी नमूद केले.
ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या विषयावर बोलण्याची अजून वेळच आलेली नाही. जेव्हा वेळ येईल, तेव्हा राष्ट्रवादीचे नेते अधिकृतरित्या येऊन सांगतील की, आमचं काही ठरलंय, तर त्यावर मी प्रतिक्रिया दिली पाहिजे. रोज पतंग कशारिता उडवायचे? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.