Sunetra Pawar : अजितदादांच्या दालनात प्रवेश करताच सुनेत्रा पवारांची कृती बघून सगळे भावूक, उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला

Sunetra Pawar Assumes Charge as Maharashtra Deputy Chief Minister : सुनेत्रा पवार यांनी आज अधिकृतपणे मंत्रालयात उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थितीत होते.
Sunetra Pawar Assumes Charge as Maharashtra Deputy Chief Minister
Sunetra Pawar Take Charge as Maharashtra Deputy Chief MinisterSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी आज दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी मंत्रालयात अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पार्थ पवार यांच्यासह पक्षाचे अनेक आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर रिक्त झालेल्या या पदाची जबाबदारी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्याने आजचा दिवस राज्याच्या राजकारणात अत्यंत ऐतिहासिक आणि भावूक ठरला.

३१ जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर आज त्यांनी अधिकृतपणे कामाची जबाबदारी घेतली. पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी सकाळी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

Sunetra Pawar Assumes Charge as Maharashtra Deputy Chief Minister
Devayani Farande : नाशिकमध्ये किन्नर समाजाच्या मोर्च्यात भाजप आमदार देवयानी फरांदे, नेमकं प्रकरण काय?

त्यानंतर सुनेत्रा पवार या विधानभवन परिसरात आल्या. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यानंतर सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुनेत्रा पवार या मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात दाखल झाल्या. दालनात प्रवेश करताच सुनेत्रा पवार यांनी प्रथम खुर्चीला आणि त्यानंतर टेबलाला हात जोडून नमस्कार केला. अजितदादांच्या प्रतिमेला हात जोडून नमन केलं. आपल्या पतीच्या रिक्त झालेल्या जागेवर (उपमुख्यमंत्री पदावर) कार्यभार स्वीकारताना सुनेत्रा पवार काहीशा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

हे दृश्य पाहून त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याही डोळ्यात अश्रू तरळले. आईला वडिलांच्या जागेवर पाहून पार्थ पवार यांना रडू कोसळल्याने उपस्थित राष्ट्रवादीच्या आमदार, मंत्री व पदाधिकाऱ्यांमध्ये काही काळ शांतता पसरली होती. सगळेजण भावूक झाले होते.

Sunetra Pawar Assumes Charge as Maharashtra Deputy Chief Minister
Purandar ZP Results : माजी आमदार संजय जगतापांना हाताशी धरत भाजपकडून विजय शिवतारेंच्या गडाला सुरूंग

दरम्यान, पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार या त्यांच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार आहेत. सुनेत्रा पवार यांची ही पहिलीच कॅबिनेट बैठक असणार आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागून आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com