Eknath Shinde-Devendra Fadnavis
Eknath Shinde-Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

शाहंसोबतच्या बैठकीनंतरही मंत्रिपदाचे इच्छुक गॅसवर; आमदारांच्या असंतोषाची भीती?

सरकारनामा ब्यूरो

Eknath Shinde News : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी महत्त्वापूर्ण बैठक घेतली. या बैठकीनंतर महाराष्ट्रातील प्रश्नावर अमित शाह (Amit Shaha) यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची चर्चा झाल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस हे अमित शाह यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरवणार आहेत, अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. कालच ही महत्त्वाची बैठक होऊनही मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख निश्चित झाली नसल्याची, माहिती आता समोर येत आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार, असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी दिवाळीमध्ये सांगितले होते. मात्र, आता एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर मौन पाळत आहेत. तर त्याचे समर्थक आमदार मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधुन बसले आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त काही ठरत नाही आहे.

दोन्ही नेत्यांनी शाह यांच्यासोबत सुमारे 30 मिनिटे चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत 19 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तारावर एकमत होऊ शकले नसल्याचेही चर्चा आहे. त्यामुळे आता जानेवारी महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह 20 मंत्री आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करून शिंदे यांच्यासोबत आलेल्या शिवसेनेच्या 40 आमदारांपैकी अनेकांना मंत्री व्हायचे आहे. दुसरीकडे भाजपचे अनेक ज्येष्ठ आमदारही मंत्री होण्याच्या प्रतिक्षेत आहे. मंत्रिमंडळ विस्तारामुळे ज्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही, ते आमदार नाराज होऊ शकतात, असे अशी भिती असल्यामुळेच विस्तार होत नाही, असी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT