मल्हारपेठ विभाग : उद्धव ठाकरेंची शिवसेना ठरली पाटणकर- देसाई गटाची डोकेदुखी

Shivsena Dividetion शिवसेनेच्या फुटीनंतर पारंपरिक देसाई- पाटणकर गटात होणाऱ्या निवडणुकीत आता ठाकरे शिवसेना गटाने आव्हान उभे केले आहे.
Udhav Thackeray, Shambhuraj Desai, Vikramsinh Patankar
Udhav Thackeray, Shambhuraj Desai, Vikramsinh Patankarsarkarnama

मल्हारपेठ : पाटण तालुक्यातील मल्हारपेठ विभागातील नाडे, उरूल, गारवडे येथे गटांगर्तत उमेदवार सरपंचपदासाठी उभे ठाकल्याने रंगत वाढली आहे. ठाकरे शिवसेनेचे गटही अनेक ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात असल्याने पारंपरिक देसाई- पाटणकर गटाची डोकेदुखी वाढली आहे. विकासकामांच्या मुद्द्यावर मारुल हवेलीची निवडणूक होणार आहे. थेट सरपंचपदामुळे महत्त्व आले आहे.

पाटण तालुक्यातील राजकारणात हा विभाग महत्त्वपूर्ण समजला जातो. सध्या विभागात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. थेट सरपंचपदामुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे. मात्र, राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे तालुक्यात त्याचे पडसाद उमटत आहेत. शिवसेनेच्या फुटीनंतर पारंपरिक देसाई- पाटणकर गटात होणाऱ्या निवडणुकीत आता उद्धव ठाकरे शिवसेना गटाने आव्हान उभे केले आहे.

त्यामुळे ग्रामपंचायतीचे निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक तोटा मंत्री देसाई गटाला होणार असल्याची चर्चा आहे. विभागातील उरूल, नाडे या मोठ्या ग्रामपंचायतीत देसाई गटांतच दोन परस्पर उमेदवार उभे ठाकल्याने डोकेदुखी वाढली आहे. नाडेत सरपंचपदासाठी महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार असून, देसाई गटातील बंडखोरीमुळे रंगत वाढली आहे. ठाकरे शिवसेनेने सदस्यपदासाठी वॉर्डात फिल्डिंग लावली आहे.

Udhav Thackeray, Shambhuraj Desai, Vikramsinh Patankar
Karad News: सैनिकांच्या प्रश्नाबाबत राज्य सरकार संवेदनशील : शंभूराज देसाई

त्यामुळे या ठिकाणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय पवार यांच्या गनिमीकाव्याचा कस लागणार आहे. उरूलमध्ये दोन्हीही गटांकडून दोन- दोन उमेदवार उभे राहिल्याने चुरस निर्माण झाली आहे. पाटणकर गटाच्या पुढाऱ्यांनी गटांतर्गत एका उमेदवाराची नाराजी दूर करून विरोधी उमेदवाराचा पाठिंबा घेऊन रंगत वाढवली आहे. यामुळे उरूलच्या पाटणकर गटाचा सरपंच होण्याच्या आशा वाढल्या आहेत.

Udhav Thackeray, Shambhuraj Desai, Vikramsinh Patankar
उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना `सीबीआय`चा मोठा दिलासा!

सत्ताधारी गटातून मंत्री देसाई यांचे विश्वासू कार्यकर्ते सरपंचपदाचा उमेदवार आहे. मात्र, मंत्री देसाई गटातूनही बंडखोरी झाल्याने देसाई गटाची डोकेदुखी वाढली आहे. गारवडेतही देसाई- पाटणकर गटात लढत होत आहे. त्यात पाटणकर गटातील बंडखोरीमुळे चुरस वाढली आहे. नाडे, उरूल, गारवडेत बंडखोरांसह तिरंगी लढतीमुळे चुरस वाढली आहे. त्यामुळे निकालानंतर गुलाल कोणाला मिळणार? हे लवकरच स्पष्ट होईल.

Udhav Thackeray, Shambhuraj Desai, Vikramsinh Patankar
Satara : उदयनराजे म्हणतात, चोरी करणाऱ्यांची बोटे छाटा.. बलात्काऱ्यांचे...

बंडखोरीचे ग्रहण...

ठाकरे शिवसेनेने नाडे, वेताळवाडी येथे आव्हान उभे केले आहे. मारुल हवेली, बहुले, गारवडे, शेडगेवाडी, गीरेवाडी, निसरे व आडूळ, तसेच आडूळपेठ, लुगडेवाडीत देसाई- पाटणकर गटात लढत असली, तरी बंडखोरीच्या ग्रहणाने डोकेदुखी वाढवणार आहे.

Udhav Thackeray, Shambhuraj Desai, Vikramsinh Patankar
Patan : बाळासाहेबांच्या शिवसेनेचे १६१ सदस्य, १८ सरपंच बिनविरोध... शंभूराज देसाई

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com