Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Maharashtra Cabinet Expansion: राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार?; मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले संकेत

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रीपदाची रविवारी शपथ घेतली. तसेच त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर देखील दावा केला आहे.

अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार की नाही? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. तर काहीजण नाराज झाल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या. मात्र, आता राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मोठे संकेत दिले आहेत.

अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता पुढील आठवड्यात पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, असे सूचक विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. तसेच इच्छुकांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली असल्याचे वृत्त 'साम टीव्ही'ने दिले आहे.

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

"तातडीने मंत्रिमंडळ विस्तार होईल. यामध्ये इच्छुक आमदारांना संधी दिली जाईल. एक आठवड्याच्या आत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल", असं माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT