NCP News: पवारांना पक्षाध्यक्ष मानता, मग त्यांनी केलेली कारवाई का मान्य नाही? जितेंद्र आव्हाडांचा खडा सवाल

Jitendra Avhad : अजित पवारांसह 'त्या' नऊ जाणांना फक्त एकच पर्याय; जितेंद्र आव्हाड थेटच बोलले....
Jitendra Avhad:
Jitendra Avhad: Sarkarnama
Published on
Updated on

NCP News: अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रीपदाची रविवारी शपथ घेतली. त्यानंतर आता सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली. याबरोबरच अजित पवारांची राष्ट्रवादीचे विधिमंडळ गट नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली.

एवढंच नाही तर जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र पाठवलं असल्याची माहितीही अजित पवारांनी दिली. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही पत्रकार परिषद घेत अजित पवार यांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्याला प्रतिउत्तर दिलं आहे.

Jitendra Avhad:
Ajit pawar news live: जयंत पाटील-जितेंद्र आव्हाडांवर अपात्रतेच्या कारवाईसाठी अजितदादांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र

जितेंद्र आव्हाड म्हणाले, "राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत. हे त्या किटी पार्टीत बसलेल्यांनी देखील मान्य केलं आहे. निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या पक्षाच्या संविधानानुसार पक्षाच्या अध्यक्षांना सर्व अधिकार आहेत. पक्षाच्या अध्यक्षांकडे समिती सदस्यांना बडतर्फ करण्याचे अधिकार आहेत. शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांना कुणाच्याही निवडी करण्याचा अधिकार नाही", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Jitendra Avhad:
NCP Breaking News : अजित पवारांची राष्ट्रवादीचे विधिमंडळ गट नेते म्हणून नियुक्ती; प्रफुल्ल पटेलांची घोषणा

"याबरोबरच व्हिपची नियुक्ती करण्याचा अधिकार हा राजकीय पक्षाला असतो, असं सुप्रीम कोर्टाने देखील जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे. तसेच निवडून आलेल्या आमदारांचा पक्ष होत नाही", असंही यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच "विधानसभेतील एक गट बाहेर जातो आणि मग पक्ष असल्याचा दावा करतो, असा कुठलाच अधिकारच त्या गटाला नाही", असं म्हणत त्यांनी अजित पवारांना जोरदार प्रतिउत्तर दिलं.

दरम्यान, "अजित पवार यांच्यासह जे बाहेर पडेलत त्यांना दुसऱ्या पक्षात जाण्याशिवाय पर्याय नाही. तसेच शरद पवारांना पक्षाचे अध्यक्ष मानतात तर मग त्यांनी केलेली कारवाई का मान्य नाही?", असा सवालही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com