Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde Speech: आईच्या आठवणीने मुख्यमंत्री शिंदे भरसभेत गहिवरले...

Shivsena vardhapan din 2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभेत बोलत असताना भावूक झाले

सरकारनामा ब्यूरो

Shivsena: शिवसेनेचा (शिंदे गट) ५७ वा वर्धापन दिन सोहळा मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये सोमवारी (दि.१९) पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

"आधीचे मुख्यमंत्री खिशाला पेनच ठेवत नव्हते. पण माझ्याकडे दोन दोन पेन आहेत. मी रस्त्यावरही लोकांच्या कामाच्या सह्या करतो. अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांनी जेवढ्या सह्या केल्या नाहीत, त्या मी एक दिवसात केल्या", असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभेत बोलत असताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. शिंदे म्हणाले, "शिवसेनेसाठी काम करत असताना माझी आई आजारी होती. आईवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. इकडे लोकसभेची निवडणूक होती. आईवर उपचार सुरु असताना डॉक्टरांचा फोन मला आला, तेव्हा माझ्या मनात पाल चुकचुकली होती".

"त्यावेळी शिवसेनेचे गावीत उमेदवार होते. ते मला म्हणाले सभा नऊ वाजेपर्यंत संपेल. पण कसं सांगू त्यांना माझी आई नाही. माझ्या आईचा जीव गेला, ती या जगात नाही. मात्र, मी त्यांना सांगितलं की, आपण सभा पूर्ण करु. सभा पूर्ण करुन आलो, त्यानंतर आईचं अत्यंदर्शन घेतलं", असं सांगत मुख्यमंत्री शिंदे यांना भर सभेत गहिवरून आलं.

शिंदे म्हणाले, "आम्ही शिवसेनेसाठी जीवाला जीव देत काम केलं. कष्ट केले. कधीही घरादाराची पर्वा केली नाही. शिवसेनेसाठी अनेक लोकं जेलमध्ये गेलेत. मग त्यावेळी तुम्ही कुठे होता. तुमच्यावर किती केस झाल्या".

"एकनाथ शिंदे शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री झाला, यामागे फक्त कष्ट आणि मेहनत आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि आनंद दिघे यांची शिकवण, याबरोबरच तुमच्या सर्वांची साथ आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री झाला", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT