Eknath Shinde, Ramesh Bais News
Eknath Shinde, Ramesh Bais News Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

सरकारनामा ब्यूरो

Eknath Shinde Meet To Governor News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांची ही नियोजित भेट नसल्याचे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्री अचानक राज्यपालांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिंदे यांनी अचाण भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. या घडामोडींदरम्यान एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीमागचे कारण समोर आलेले नाही. मात्र, भेटीचे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस यांच्यात बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. याबाबत कोणतीही अधिकृत अशी माहिती समोर आलेली नाही. मात्र, अचाण घेतलेल्या या भेटीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कधीही जाहीर होऊ शकतो. या निकालाच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याची चर्चा आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व राज्यपाल रमेश बैस यांची ही पहिलीच भेट आहे. राज्यात सत्तांतर झाले त्यावेळी भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे राज्यपाल होते. दरम्यान, रमेश बैस यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. राजभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, केंद्रीय कायदेमंत्री किरण रिजिजू आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यात मुंबईत (Mumbai) बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे हे राज्यपालांच्या भेटीला गेल्यामुळे अधिक चर्चा होत आहेत. अर्थात या बैठकीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे नार्वेकर यांनी सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT