Supreme Court News : राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाची प्रतिक्षा संपणार... 'या' तारखा महत्त्वाच्या...

Supreme Court : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाची प्रतिक्षा अनेक दिवसांपासून आहे.
Uddhav Thackeray Eknath Shinde News
Uddhav Thackeray Eknath Shinde News Sarkarnama

Maharashtra Political News : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाची प्रतिक्षा अनेक दिवसांपासून आहे. मात्र, हा निकाल आता लवकरच येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणावर प्रदीर्घ सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालायने आपला निकाल राखीव ठेवला आहे. मात्र, आता निकालाची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालासाठी आता केवळ चार ते पाच तारखाच उरल्या आहेत. 8 ते 12 मे या कालावधीत सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याच तारखांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच कायदेतज्ज्ञांच्या वर्तुळातही हीच चर्चा आहे.

Uddhav Thackeray Eknath Shinde News
Sharad Pawar : देशमुख, शिंदे, अशोक चव्हाणांनी आघाडी सांभाळली; पण पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीलाच केले लक्ष्य : पवारांचा पुस्तकात मोठा खुलासा

ज्या घटनापीठासमोर महाराष्ट्राच्या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यातील एक न्यायामूर्ती एम. आर. शाह हे 15 मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे निकाल त्याच्याआधीच येणार आहे. त्यामुळे हा निकाल १५ मेच्या आधी येणार असल्याचे सांगितले जात आहे. 13 आणि 14 मे रोजी शनिवार आहे. त्यामुळे 8 ते 12 या तारखांमध्ये कोणत्यादी दिवशी निकालाची शक्यता आहे.

शिवसेनेच्या (Shivsena) फुटीनंतर महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडल्या आहेत. जवळपास २६ जून २०२२ पासून या प्रकरणात सर्वोच न्यायालयात सुनावणी सुरु आहे. सुरुवातीला सुट्टीकालीन दोन न्यायामूर्तींच्या समोर सुनावणी झाली. त्यानंतर माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे आणि नंतर पाच न्यायामूर्तींच्या घटनापीठासमोर ही सुनावणी झाली.

Uddhav Thackeray Eknath Shinde News
Sharad Pawar : 'अजितने दिलगिरी व्यक्त केली, आमच्यासाठी तेवढे पुरेसे होते' : पहाटेच्या शपथ विधीविषयी पवारांचा पुस्तकात मोठा खुलासा

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर 14 फेब्रुवारी ते 16 मार्च सलग सुनावणी झाली. तेव्हापासून हा निकाल राखीव आहे. ज्या घटनापीठाला सत्तासंघर्षाचा निकाल द्यायचा आहे. त्या घटनापीठासमोर दोन निकाल प्रलंबित आहेत. एक महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा आहे. दुसरा दिल्ली आणि केंद्र सरकारमधल्या अधिकारांच्या वादाचा आहे. दिल्ली आणि केंद्र सरकारचे प्रकरणाचा निकाल 17 जानेवारीपासून प्रलंबित आहे.

सध्या कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरु आहेत. 10 मेला मतदान आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल कर्नाटकच्या मतदानानंतर (Karnataka) येतो का याची उत्सुकता आहे. तसे झाले तर 11 आणि 12 मे या दोन तारखा अधीक महत्वाच्या ठरतात, अशी चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com