Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई आहेत. मात्र देसाई पालकमंत्री असूनही ठाण्याकडे लक्ष नसल्याचे स्थानिक आमदारांची भावना आहे. मुख्यमंत्री शिंदेंची ठाण्यावर विशेष ममता असताना 'सरोगेट पालकमंत्री' हवेतच कशाला ? अशी कुजबुज स्थानिक आमदारांमध्ये सुरू आहे. यामुळे आता पालकमंत्री पदावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. (Latest Marathi News)
शिंदे गटाचे नेते व राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांच्या ठाणे पालकमंत्री पदाबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. ठाण्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांना जिल्ह्याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याची टीका विरोधक करत आहेत.
मंगळवारी (दि.२२) शंभूराज देसाईंच्या सांगण्यावरून डीपीडीसीची बैठक ही बोलवण्यात आली होती. मात्र ही बैठक अचानक रद्द करून पुढील बैठकीची तारीख लवकरच कळवण्यात येईल, असा मेसेज अधिकाऱ्यांच्या मोबाईलवरती आला, यामुळे ठाण्याच्या पालकमंत्री पदाबाबत सुंदोपसुंदी सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
कळवा रुग्णालयाच्या दुर्घटनेनंतरही शंभुराजे ठाण्यात अनुपस्थित असल्याची चर्चा -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जर ठाण्याचे विषय विशेष लक्ष देऊन पाहत असतील तर, बाहेरील पालकमंत्री हवेतच कशाला? एकनाथ शिंदे ममत्व भावनेने ठाण्याकडे पाहतात, मग सरोगेट पालकमंत्री हवेतच कशाला? अशी कुजबुज स्थानिक आमदारांमध्ये आहे. शिवाय मंत्री रवींद्र चव्हाण यांचा देखील पर्याय ठाण्याच्या पालकमंत्री पदासाठी योग्य असल्याचे बोलले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.