Uddhav Thackeray News : लोकसभा मतदारसंघांचा आढावा; शिवसेना ठाकरे गटाने आखली भाजपविरोधात 'रणनीती' !

Uddhav Thackeray ON Lok Sabha News : "केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा नागपूर मतदारसंघाचा आढावा.."
Shivsena ; Uddhav Thackeray
Shivsena ; Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू आहे. सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडूनही लोकसभेसाठी रणनीती आखण्यात येत आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला बहाल केल्यानंतर या विरोधात ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आले आहे. हे प्रकरण न्यायलयात प्रलंबित असले तरी ठाकरे गटाकडून निवडणुकांची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Shivsena ; Uddhav Thackeray
BJP MLA Serious Allegation On Khadse : एकनाथ खडसे अधिकाऱ्यांना ‘ब्लॅकमेल’ करतात; भाजप आमदार मंगेश चव्हाणांचा गंभीर आरोप

शिवसेना ठाकरे गटाकडून यापूर्वीच काही लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला होता. यानंतर आता आजपसून म्हणजेच 22 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान दुसऱ्या टप्प्यात एकूण 9 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मतदारसंघ असलेल्या नागपूर मतदारसंघाचा 25 तारीखेला घेणार आढावा ठाकरे गटाकडून घेण्यात येणार आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसनेचे १८ खासदार विजयी झाले होते. त्यामुळं पक्षातील फुटीनंतर होणारी पहिली लोकसभा ठाकरेंसाठी महत्त्वाची असणार आहे. पहिल्या टप्प्यात उद्धव ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना भाजपच्या विरोधात लढण्याची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. येणारी निवडणूक 'इंडिया' आघाडी म्हणून लढणार असल्याचं, उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे

लोकसभानिहाय मतदार संघाच्या बैठकीला त्या त्या मतदारसंघातील संपर्क नेते, स्थानिक उपनेते, जिल्हासंपर्कप्रमुख, स्थानिक विभागीय महिला संघटीका, जिल्हाप्रमुख, खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख शहरप्रमुख (प्रमुख शहरातील), विधानसभाप्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख (मुंबई) उपस्थित राहणार आहेत.

Shivsena ; Uddhav Thackeray
Maharashtra Political Crisis : शिवसेना-काँग्रेसचा राष्ट्रवादीला दे धक्का ; महाविकास आघाडी फुटणार?

दुसऱ्या टप्प्यातील लोकसभानिहाय मतदार संघाच्या बैठकांचा वेळापत्रक -

22 ऑगस्ट -

दुपारी 12.30 - बुलढाणा

दुपारी 3.00 - अकोला

दुपारी 4.00 - अमरावती

24 ऑगस्ट -

दुपारी 12.30 - वर्धा

दुपारी 3.00 - यवतमाळ-वाशीम

दुपारी 4.00 - रामटेक

25 ऑगस्ट -

दुपारी 12.30 - नागपूर

दुपारी 3.00 - भंडारा गोंदिया

दुपारी 4.00 - गडचिरोली-चिमूर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com