Aditya Thakre
Aditya Thakre Sarkarnama
मुंबई

'वेदांता-फॉक्सकॉन' प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंनी समोरा-समोर येवून चर्चा करावी; आदित्य ठाकरेंचे आव्हान

सरकारनामा ब्यूरो

Aditya Thackeray News : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुन्हा आव्हान दिलं आहे. राज्यातील वेदांता-फॉक्सकॉन हे प्रकल्प गुजरातला कसे गेले? असं विचारात मुख्यमंत्री शिंदेंनी या विषयावर आपल्याशी माध्यमांसमोर चर्चा करावी, असं थेट आव्हान दिलं आहे. ठाकरे आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, ''वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) हा प्रकल्प गुजरातला गेला. याबाबत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी बोलावं. त्यांनी माझ्यासमोर येवून या विषयावर डिबेट करावी. मग आपण पाहू की वेदांता-फॉक्सकॉन गुजरातला कसा गेला''.

''सध्या जे सरकार सत्तेत बसलंय ते खोके सरकार आहे. हे सरकार आम्ही केलेल्या प्रत्येक कामाचं क्रेडिट घेण्याचं काम करतंय. दादरच्या स्थानिक गंद्दारांनी हवेत गोळीबार केला, त्यांच्यावर अद्याप काहीच कारवाई झाली नाही. सध्या मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी फक्त घोषणा केल्या आहेत. पण शेतकऱ्यांना काहीच फायदा झाला नाही, असंही यावेळी ते म्हणाले.

''वेदांता-फॉक्सकॉन या प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांची एक बैठक झाली होती. त्या बैठकीत नेमकं काय झालं होतं? हे त्यांनी स्पष्ट करावं. की, त्या बैठकीत वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला (Gujarat) हलवण्याचंच ठरलं होतं. हे महाराष्ट्राच्या (Maharashtra) समोर यायला हवं'', असं सांगत त्यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत संपूर्ण पत्रच माध्यमांसमोर वाचून दाखवलं.

दरम्यान, ''आघाडी सरकारने केलेल्या कामाचं क्रेडिट घेण्याचं काम या सरकारकडून सुरू आहे. मात्र हे सरकार खूप कमी दिवसाचं आहे. तुम्ही पाहता की राज्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात दोन हेलिपॅड आहेत'', असं म्हणत आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) मुख्यमंत्री शिंदेंना टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT