`राष्ट्रवादी`ला धक्का... पक्षाच्या माजी नगरसेविका वैशाली दाणी शिंदे गटात

वैशाली दाणी प्रदिर्घ काळ समता परिषदेच्या पदाधिकारी म्हणून कार्यरत होत्या.
Vaishali Dani with CM Eknath Shinde
Vaishali Dani with CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : सातत्याने शिवसेना (Shivsena) व अन्य पक्षाच्या लहान लहान कार्यकर्ते, नगरसेवकांच्या दारी जाऊन शिंदे गटाचे (Eknath Shinde) स्थानिक पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. यामध्ये आज त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) माजी नगरसेविका वैशाली दाणी (Vaishali Dani) हाती लागल्या. आज मुंबईत त्यांचा प्रवेश झाला. त्यामुळे राष्ट्रवादीला हा धक्का ठरण्याची शक्यता आहे. (Chhagan Bhujbal supporter Vaishali Dani resgine from NCP in Nashik).

Vaishali Dani with CM Eknath Shinde
अजितदादा शिंदे गटाचे उमेदवार झालेल्या संजय पवार यांचे काय करतील?

महात्मा फुले समता परिषदेच्या अनेक वर्षे विभागीय अध्यक्ष राहिलेल्या वैशालीताई दाणी यांनी राष्ट्रवादी पक्ष।ला रामराम ठोकला. त्या शहरातील देवळालीगाव परिसरातील सक्रीय कार्यकर्त्या होत्या. विविध उपक्रमांत त्या सक्रीय असत. त्यामुळे स्थानिक राजकारणात देवळालीगाव भागात शिंदे गटाला एक स्थानिक नेता मिळाला.

Vaishali Dani with CM Eknath Shinde
जयकुमार रावल यांची १९ कोटींची मागणी पुर्ण होईल का?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सौ. दाणी यांनी बाळासाहेबांच्या शिवसेना अर्थात शिंदे गाटत प्रवेश केला. यावेळी सचिव संजय माशेलकर, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, युवासेना जिल्हा प्रमुख सदा नवले उपस्थित होते.

नाशिक शहर व जिल्ह्यात एकनाथ शिंदे गटात पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, खासदार हेमंत गोडसे आणि महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे, जिल्हा प्रमुख अनिल ढिकले वगळता फारसे प्रभावी नेते नाहीत.

एकनाथ शिंदे गटाच्या वरीष्ठ नेत्यांचे नाशिकवर विशेष लक्ष आहेत. पालकमंत्री तसेच राज्य सरकार यांच्या माधझ्यमातून त्यांच्याकडून सातत्याने शिवसेना तसेच अन्य पक्षाच्या नेत्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी ठाणे येथून सातत्याने नाशिकला भेट देतात. कोणीतरी गळाला लागावे यासाठी त्यांची विविध स्तरावर प्रयत्न करण्याच्या सुचना आहेत. त्यांचे पदाधिकारी विविध कार्यकर्त्यांची भेट घेतात. घरी जातात मात्र अद्याप मोठे यश आलेले नाही, ही त्यांची खंत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com