Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Karnataka Election : मुख्यमंत्री शिंदेंची जादू कसब्यात 'फेल'; कर्नाटकात चालणार का?

CM Eknath Shinde : महाविकास आघाडीतील नेत्यांच्या आव्हानाला काय उत्तर देणार?

सरकारनामा ब्यूरो

Eknath Shinde on Karnataka Tour : सध्या कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजप-काँग्रेस-जनता दर (धर्मनिरपेक्ष) अशी तिरंगी लढत होणार आहे. कर्नाटकमध्ये १० मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यात तीनही पक्षांकडून प्रचाराची राळ उठविली आहे. महाराष्ट्रातून काँग्रेस आणि भाजपचे स्टार प्रचारक कर्नाटकात तळ ठोकून आहेत. आता भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही दौरा निश्चित झाला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी पुण्यातील (Pune) कसबा पेठ आणि चिंचवड येथे रोड शो घेतले होते. कसब्यात त्यांनी मोठा रोड शोचे आयोजन केले होते. सभांमधून त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच चिंचवड मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे पहाटेपर्यंत मेळावे घेतले होते. या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पुण्यात काही दिवस जातीने हजर राहिले. मात्र कसब्यात भाजप व मित्र पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. तसेच विधानपरिषद निवडणुकीतही भाजप-मित्र पक्षांच्या उमेदवारांना अपेक्षीत यश मिळाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेची जादू कसब्यात चालली नाही ती आता कर्नाटकमध्ये चालणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यापूर्वी वारंवार कर्नाटकातील बेळगाव येथे आंदोलन केल्याचा किस्सा सांगितला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भूजबळ यांच्यासह काही दिवस कर्नाटकच्या तुरुंगातही राहिल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान राज्य सरकारने महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra) सीमा भागातील नागरिकांसाठी आरोग्य योजना राबविली होती. त्यावर कर्नाटक सरकारने आक्षेप घेत रद्द केली.

या पार्श्वभूमिवर विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमा भागातील मराठी माणसांवरील अन्यायाबाबत केंद्र सरकारच्या माध्यामातून उपाययोजना करावीत, असे आव्हान केले आहे. आता मुख्यमंत्री शिंदेंचा कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारासाठी दौरा निश्चित करण्यात आला आहे.

कर्नाटकच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा एकही उमेदवार नाही. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपसाठी प्रचारासाठी जाणार आहेत. ते ६ ते ९ मे या दरम्यान कर्नाटकमध्ये प्रचार करणार आहेत. या चार दिवसांत निवडणुकीच्या प्रचारात ते महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार कशा प्रकारे चांगले काम करत आहे, यावर भर देतील.

कर्नाटकमधील (Karnataka) बेळगाव, बेंगळुरू परिसरात महाराष्ट्रीयन नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या महाराष्ट्रातील मतांना आकर्षित करण्यासाठी शिंदे कर्नाटकात रोड शो करणार आहेत. तेथे ते महाविकास आघाडीच्या आव्हानाला काय उत्तर देतील, सीमा भागातील राज्याच्या योजनेबाबत काय बोलतील याकडे आता लक्ष लागले आहे.

(Edited Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT