Cm Eknath Shinde|
Cm Eknath Shinde| Sarkanama
मुंबई

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वरील मुक्कामाचा मुहूर्त ठरला?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटून गेला, मात्र अजूनही मुख्यमंत्री वर्षा या शासकीय निवासस्थानी वास्तव्यास गेले नव्हते. शिवसेना आणि शिंदे गटातील सत्तासंघर्ष, शिंदे - फडणवीस सरकारची अनिश्चता, सरकावर न्यायालयाचे असलेली टांगती तलवार यामुळे शिंदे हे वर्षावर वास्तव्यासाठी गेले नसल्याचे बोलले जात होते. मात्र आता दिवाळीनंतर न्यायालयाने सुनावणी पटलावर घेणार असल्यामुळे, शिंदे वर्षावर राहण्यासाठी जाणार आहेत.

दिवाळीच्या शुभमुहुर्तावर मुख्यमंत्री शिंदे हे वर्षा निवासस्थानी राहण्यास जाणार असल्याचा माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे. सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाची माळ ही शिंदेंच्या गळ्यात पडली. तेव्हाच मुख्यमंत्री वर्षावर वास्तव्यास जातील अशी चर्चा होती. यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी वर्षा त्याच बरोबर तोरणा या दोन्ही बंगल्यांची पाहणी केली होती.

मुख्यमंत्र्याच्या पाहणीनंतर बंगल्यात डागडुजीचे काम सुरू केले. हे काम आता अंतिम टप्यात आले आहे. डागडूजीचे काम दसऱ्याच्या पूर्ण मुहुर्तावर हे काम होणं अपेक्षित होते. मात्र अजूनही डागडुजीचे काम पूर्ण न झाले नाही नसून, आणखी काही कालावधी या कामाला लागण्याची शक्यता आहे.

मात्र दिवाळीपर्यंत हे काम पूर्ण होऊन मुख्यमंत्री दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर वर्षावर प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे आता मुख्यमंत्री वर्षावर राहण्यासाठी जाणार असून मुख्यमंत्र्यांची दिवाळी वर्षावर साजरे होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT