उद्धवसाहेब, राष्ट्रवादीच्या अत्याचाराची दखल तुम्ही घ्यायला हवी होती : आढळरावांचे ठाकरेंना उत्तर

शिरुर मतदारसंघातील काही लोकं ‘ढळली’ पण खरी ‘अढळ’ लोकं माझ्यासोबत कायम आहेत, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना नाव न घेता टोला लगावला.
Shivajirao Adhalrao Patil-Uddhav Thackeray
Shivajirao Adhalrao Patil-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

पुणे : शिरुर (Shirur) मतदारसंघातील काही लोकं ‘ढळली’ पण खरी ‘अढळ’ लोकं माझ्यासोबत कायम आहेत, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटातील नेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांना नाव न घेता अप्रत्यक्ष टोला लगावला. या टिकेवर आढळराव यांनी सावध प्रतिक्रिया देत, ‘‘राष्ट्रवादीच्या (NCP) अन्याय अत्याचारामुळे आम्हाला जगू द्या अशी म्हणण्याची वेळ तुम्ही मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांवर आली होती. या अन्याय अत्याचारांची दखल आपण वेळीच घ्यायला हवी होती,’’ असे म्हटले आहे. (Uddhavsaheb, we should have taken cognizance of NCP's atrocities : Adhalrao)

जुन्नर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख ठाकरे यांची आज (ता. २९ सप्टेंबर) मातोश्री या निवास स्थानी भेट घेतली. या वेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ठाकरे यांनी आढळराव यांच्यावर टीका केली.

Shivajirao Adhalrao Patil-Uddhav Thackeray
भाजपने बारामतीतील राष्ट्रवादीचा महत्वाचा मोहरा लावला गळाला

या टिकेवर शिवाजी आढळराव पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ‘सरकारनामा’शी बोलताना आढळराव म्हणाले,‘‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मी टिका टिप्पणी करणार नाही. पण महाविकास आघाडीत आपण मुख्यमंत्री असताना, शिरूर लोकसभा मतदार संघातील आणि पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अन्याय अत्याचार होत होते. राष्ट्रवादीच्या अन्याय अत्याचारामुळे आम्हाला जगू द्या, अशी म्हणण्याची वेळ तुम्ही मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांवर आली होती. या अन्याय अत्याचारांची दखल आपण वेळीच घ्यायला हवी होती,’’ अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे.

Shivajirao Adhalrao Patil-Uddhav Thackeray
महेश कोठे राष्ट्रवादीत कधी येणार? : सोलापुरातील नेत्यांचा प्रश्न; जयंत पाटील म्हणाले, ‘ते आपलेच’!

दरम्यान, शिरुर मतदारसंघात शिवनेरी किल्ला आहे. या किल्ल्याच्या नावाला बट्टा लागणे हा शिवसेनेचा अपमान आहे. त्यामुळे यापुढे शिरुरच्या राजकारणात अशी गद्दार लोकं आढळता कामा नये. मी एक गोष्ट तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो की, देवाने ही आपल्याला दिलेली संधी आहे. आपल्यावर हिंदुत्त्व आणि लोकशाही टिकवण्याची आणि वाढवण्याची जबाबदारी आहे. मध्यंतरी हिंदुत्त्वाच्या खोटेगिरीचा जो कळस गाठला गेला, अशी टिका या वेळी ठाकरे यांनी केली.

Shivajirao Adhalrao Patil-Uddhav Thackeray
...त्यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची समजूत काढली होती : चव्हाणांनंतर राऊतांचा गौप्यस्फोट

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी संतोष ऊर्फ बाबा परदेशी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी शिवसेनेचे पदाधिकारी तालुका संपर्क प्रमुख प्रमुख दिलीप बाम्हणे, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, अविनाश करडिले, शरद चौधरी, जुन्नर शहर प्रमुख चंद्रकांत डोके, नारायणगावचे माजी सरपंच बाबू पाटे, जुन्नरचे माजी नगराध्यक्ष आणि माजी जिल्‍हा प्रमुख सुनील मेहेर माजी नगराध्यक्ष शाम पांडे, नगरसेवक समीर भगत, नंदू तांबोळी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com