Chitra Wagh | Rupali Chakankar Sarkarnama
मुंबई

Chitra Wagh : मैत्रिणीने दिलेल्या नोटिशीवर चित्रा वाघ म्हणाल्या; आतापर्यंत 56 आल्या, त्यात एक भर!

Chitra Wagh : जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरतीये तिला....

सरकारनामा ब्यूरो

Chitra Wagh : आपल्या वेगवेगळ्या पेहरावामुळे कायम प्रसिद्धीच्या झोतात असणारी उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद पेटला आहे. उर्फीच्या पेहरावावर वाघ यांनी आक्षेप घेतला होता. काल वाघ यांनी (दि.५ जाने.) पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी वाघ यांनी महिला आयोगावरही टिप्पणी केली होती. आयोगावर कलेल्या टिपण्णीमुळे वाघ यांना नोटीस पाठवण्यात आली होती. यावर आता वाघ यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

चित्रा वाघ ट्विट करत म्हणाल्या, स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय, याचे आज मनात शल्य आहे. राहिला विषय नोटीसीचा तर मला येणाऱ्या अशा 56 नोटीशीत आणखी १ ची भर.जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरतीये तिला नोटीस द्यायला हवी, तर तिला ती न देता हा नंगानाच होऊ देणार नाही. अशी भूमिका घेणारीला पाठवली. असो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरूच राहणार."

दरम्यान, महिला आयोगाच्या अध्य़क्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) म्हणाल्या होत्या की, "अभिनेत्री तेजस्विनी पंडीत यांना महिला आयोगाने कोणताही पत्र पाठवलेले नव्हते.दिग्दर्शक संजय जाधव यांना पत्र पाठवलं होतं.'अनुराधा' या वेबसिरीजचे पोस्टर शहरभर लावले गेले होते. या पोस्टरबाबत पालकांनी तक्रार केल्यानंतर संजय जाधव यांना आयोगाने पत्र पाठवले होते. यामुळे तेजस्विनी पंडीत यांना महिला आयोगाने पत्र पाठवले, अशी चित्रा वाघ यांनी चुकीची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे दिला आहे."

"आयोग तीस वर्षापासून काम करतंय, आयोगाची गरिमा मोठी आहे. कर्तुत्ववान स्त्रियांनी आयोगासाठी योगदान दिलेले आहे. मात्र स्वत:च्या प्रसिद्धीसाठी आयोगावर खोटे आरोप करण्यात येत, त्यामुळे आता चित्रा वाघ यांना अयोगाच्या वतीने नोटीस पाठवण्यात येत आहे. ही नोटीस आता वाघ यांना गेलेली आहे." असे चाकणकर म्हणाल्या.

'आपण राज्य महिला आयोगाची अप्रतिष्ठा होईल, असे वक्तव्य केले आहे, असा ठपका आता चित्रा वाघ यांच्यावर ठेवण्यात आलेले आहे. दोन दिवसात स्पष्टीकरण देण्यात यावे असे आदेशच नोटीसीद्वारे वाघ यांना देण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT