Sushma Andhare, Chitra Wagh Sarkarnama
मुंबई

Chitra Wagh Vs Sushma Andhare: सुषमा अंधारेंचा आरोप खोडून काढलाच, ठाकरेंसोबतच्या त्या भेटीवरही चित्रा वाघांचा मोठा खुलासा

Chitra Wagh Controversy News : सभागृहातला भाजपच्या विधानपरिषद आमदार चित्रा वाघ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अनिल परब यांच्यातील वाद आता सोशल मीडियात चित्रा वाघ विरुद्ध ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यापर्यंत पोहोचला आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : बॉलिवूडची टँलेट मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावरुन पुन्हा एकदा राजकारण पेटलं आहे. या प्रकरणावरुन गेले दोन दिवस विधिमंडळ सभागृहात चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला आहे. सभागृहात भाजप आमदार चित्रा वाघ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अनिल परब यांच्यातील वाद आता सोशल मीडियात चित्रा वाघ (Chitra Wagh) विरुद्ध ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यापर्यंत पोहोचला आहे. पुन्हा एकदा वाघ यांनी अंधारेंचा दावा खोडून काढतानाच उद्धव ठाकरेंबाबतही खळबळजनक विधान केलं आहे.

भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी शुक्रवारी(ता.21) विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यासह अनिल परब यांनाही फटकारलं.त्या म्हणाल्या, आमच्या घरदारावर कोणी बोलणार असेल, तर त्याला आम्ही देखील तसंच उत्तर देणार. अनिल परबांसारखी नीच प्रवृत्तीचे लोक महिलांविषयी घाणेरडे बोलतात,तेव्हा त्यांना उत्तर नाही द्यायचं मग कधी द्यायचं. विरोधकांचे मुद्दे संपले म्हणून आमच्या घरदारावर येणार का. अशी नीच प्रवृत्ती आता ठेचलीच आहे,जर पुन्हा नादाला लागाल,तर पुन्हा ठेचून काढेन अशा आक्रमक इशाराही वाघ यांनी परबांना दिला.

यावेळी त्यांनी सुषमा अंधारेंवरही टीकेची झोड उठवली. त्या म्हणाल्या,ज्याची जशी लायकी,ते तेवढाच विचार करणार आहेत. त्या ज्या बोलल्या,त्यात त्यांची चूकच नाही.त्यांची लायकीच तीच आहे.सतराशे छप्पन,छप्पन अशा प्रवृत्तीचे पुरुषांना मी पायाला लावून फिरते. तशीच त्याचे वक्तव्ये येणार आहेत.ज्यांच्या डोक्यात घाणरडे विचार आहेत,ते तशीच विधानं करणार आहे.

त्यांनी माझ्या बोलण्यावर काल ट्विट केलं,ते नेहमीच करतात.सतत माझ्या कॅरेक्टरवर,वेडेवाकडं बोलण्याचा प्रयत्न असतो.विरोधी पक्षातील अनेकजण बोलून थकले,आता यांचं सुरु झालं आहे. माझ्या कॅरेक्टरला धरुन एकच प्रश्न ते किती दिवस विचारणार आहेत. बरं त्या आहेत कोण..? असा सवालही त्यांनी केला. या सटरफटर वटवाघळांची लायकीच ती आहे, कोणत्याही परिस्थितीतून असलं काहीतरी घाणेरडं निर्माण करायचं, आम्हांला पण घरदार आहे ना,संसार आहे,की आम्ही काय रस्त्यावर पडलोय का..? असा तिखट पलटवारही वाघ यांनी अंधारेंवर केला.

आम्हांला पण बोलता येतं,मग मी एकच प्रश्न विचारला,त्याचं उत्तर दिलंच नाही. त्यांचा तो नवरासारखा प्रेस कॉन्फरन्स घेऊन माझ्या मुलीची डीएनए टेस्ट करा अशी मागणी करतोय. कुणाच्याही लेकरावर अशी वेळ येऊ नये,मला कालही ट्विट करताना दु:खं होतंय,आणि आजही बोलताना त्रास होत आहे. पण त्यात त्या लेकराचा दोष नाही.पण ज्यांनी जन्म दिला त्यांना तर अक्कल पाहिजे असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

आत्ता ठेचलं आहे, कोणाच्या मुलाबाळावर बोलणं मलाच आवडत नाही, पण जर तुम्ही दहा वेळेस आमच्या कॅरेक्टरवर बोलत असाल तर त्याचं उत्तर आम्ही देणार. हम किसीको छेडते नही,पर अगर किसीने छेडा तो छोडते भी नही..असे म्हणत चित्रा वाघ यांनी सभागृहातील घटनेवर आणि त्यानंतर सुषमा अंधारे यांच्याकडून करण्यात आलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

तसेच ‘कधी काळी या बाई उद्धव ठाकरेंकडे पक्ष प्रवेशासाठी अगदी लोळत आल्या होत्या’, या सुषमा अंधारेंच्या जिव्हारी लागणारी टीकेलाही चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.त्या म्हणाल्या,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच शिवसेना ठाकरे गटाचे आताचे आमदार मिलिंदजी नार्वेकर यांच्याकडे निरोप पाठवला होता.

चित्राताई एकदा येऊ भेटा. तुमच्यासारख्या महिला आम्हाला आमच्या पक्षात पाहिजे, मी जाणं न जाणं हा नंतरचा भाग होता. पण त्यांच्या शब्दाला मान म्हणून मी नक्की गेले होते. मी नव्हते गेले तर त्यांनी मला बोलावलं होतं असं म्हणत अंधारेंचा दावाही खोडून काढला.

याचा खरेपण म्हणजे एकनाथ शिंदे साहेब पण होते त्यांनी मला सांगितलं की एकनाथ शिंदे हे सर्व कोऑर्डिनेट करतील, त्यामुळे मिलिंदजी मला दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील घेऊन गेले.तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं मला ठरवू द्या मी अजून विचार केलेला नाही.तेव्हा ते मला म्हणाले नाही-नाही तुम्ही आमच्या पक्षात याच. त्यावेळी तिथे आदित्य ठाकरे देखील होते, असा खुलासा करतानाच चित्रा वाघ यांनी ठाकरेसेनेच्या सुषमा अंधारे यांच्या दाव्यातील हवाच काढून टाकली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT