
Mumbai News : महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाच आता दुसरीकडे औरंगजेबाची कबर काढण्यावरून मोठा वाद पेटला आहे.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेली मुघल सम्राट औरंगजेब याची कबर उखडून टाकण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांकडून जोर धरू लागली असतानाच औरंगजेबाची (Aurangzeb Controversy) कबर पाडण्याची आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला राष्ट्रीय स्मारकांच्या यादीतून ही कबर वगळण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका शुक्रवारी (ता.21) मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेला औरंगजेबाचा वाद आता हायकोर्टात पोहचला आहे. औरंगजेबाची कबर हटवणारी व भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला राष्ट्रीय स्मारकांच्या यादीतून वगळण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दाखल केली आहे. यामुळे आता या याचिकेवर हायकोर्ट कधी सुनावणी घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तर दुसरीकडे,नागपुरात दंगल उसळल्यानंतर मराठवाड्यातही तणावजन्य परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत.त्याचमुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे एनआयए दिल्लीचे एक पथक छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाले आहे. या पथकाकडून खुलताबाद परिसराची पाहणी करण्यात आली आहे.
विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि इतर हिंदू संघटनांच्या निषेधानंतर छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या थडग्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.कबरीच्या संरक्षणासाठी टिन शेड बसवण्यात आले आहेत.यासोबतच तेथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
भाजप मंत्री नितेश राणे यांच्याकडून धार्मिक तेढ निर्माण करणारी विधानं करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यातच समाजवादी पक्षाचे नेते अबू असीम आझमी यांनी औरंगजेबावर स्तुतीसुमनं उधळली. औरंगजेबाचे कौतुक केल्याबद्दल आझमी यांना विधानसभेतून निलंबितही करण्यात आले. त्यातच औरंगजेबाची कबर हटवल्याच्या निषेधानंतर सोमवारी(ता.17 मार्च)नागपूरमध्ये हिंसाचार उसळला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.