Chitra Wagh Sarkarnama
मुंबई

Chitra Wagh : हा फुसका बार! आमचं देशमुखांच्या पेनड्राईव्हकडं लक्ष; नादी लागू नका, चित्रा वाघांचा विद्या चव्हाणांना इशारा

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : राज्यात आजी-माजी गृहमंत्र्यांमधील सुरू झालेले पेनड्राईव्हचे राजकारण आता शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या कुटुंबापर्यंत पोचले आहे. विद्या चव्हाण यांनी कारनामे सांगणार असे म्हणत चित्रा वाघ यांनी आपल्या सूनेला भडकवल्याची ध्वनीफित ऐकवली.

त्यावर वाघ यांनी सूनेला मदत केल्याचे स्पष्ट केले. तसेच आम्हाला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पेनड्राईव्हची अपेक्षा होती मात्र हा फुसका बार मधेच आला, असा टोलाही वाघ यांनी चव्हाण यांना लगावाला.

चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत त्यांची सून गौरी चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्या संवादातील एक धनीफित ऐकवली. त्यात वाघ यांनी सुनेला माझ्याविरोधात भडकवत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. फडणवीस यांच्या सांगण्यावरून वाघ यांनी तसे केल्याचे दावा चव्हाणांनी केला. त्यावर वाघ यांनी चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली.

वाघ म्हणाल्या, विद्या चव्हाणांचे Vidya Chavan आरोप ऐकले. कालपासून चित्रा वाघ यांचे कारनामे सांगून सनसनाटी पसरवण्याचा प्रयत्न केला. त्या माझ्याबाबत चांगले बोलतील याची अपेक्षाच नाही. मात्र त्या जसे सांगतात की जे काही मी सांगितले ते बोलणे माझे नाही, फडणवीस आणि भाजपचेही नाही. ते बोलणे सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे आहे. ते सर्व विधानसभेच्या रेकॉर्डवर आहे, असा दावाही वाघ यांनी केला.

पवारसाहेब, सुप्रियाताई तुमच्या गँगला आवरा. असल्या कच्च्या खिलाडूमुळे माझा आवाज दाबला जाऊ शकत नाही. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. तुमच्यामधील कला मला माहीत आहेत. तुमच्या सुनेला मदत करणे अपराध असेल तर मी असे हजार गुन्हे करेन. आपल्या वयाला शोभेल असे वागा, पुन्हा असले फुसके बॉम्ब सोडू नका, असा इशाराही वाघ Chitra Wagh यांनी चव्हाण यांना दिला आहे.

आडात नाही तर पोहऱ्यात येणार नाही. त्यामुळे आम्हाला विद्या चव्हाणांच्या पेनड्राईव्हचा नाही तर अनिल देशमुखांनी Anil Deshmukh त्यांचा पेनड्राईव्हची खरी प्रतीक्षा आहे. त्यांनी त्यांचा पेनड्राईव्ह समोर आणला तर त्यानंतर तीन तासांतच जे काही असेल ते लोकांसमोर मांडू. माझ्या नादी लागायचे नाही, असा इशाराही चित्रा वाघ यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांना दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT