Vidya Chavan Vs Chitra Wagh : विद्या चव्हाणांनी बाहेर काढली चित्रा वाघ यांची ऑडिओ क्लिप

NCP BJP Maharashtra Politics : चित्रा वाघ यांनी आपल्या कौटूंबिक प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केले आहेत.
Chitra Wagh Vidya Chavan
Chitra Wagh Vidya ChavanSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात व्हिडिओ क्लिपवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांची एक ऑडियो क्लिप बाहेर काढली आहे.

विद्या चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले. चित्रा वाघ यांनी नुकतेच शरद पवार यांच्यासह पक्षातील काही नेते व सामाजिक कार्यकर्त्यांचे व्यंगचित्र सोशळ मीडियात शेअर केले आहेत. त्यावरून विद्या चव्हाण यांनी वाघ यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

Chitra Wagh Vidya Chavan
Amol Mitkari : अमोल मिटकरींची गाडी फोडली; अकोल्यात राडा...

चव्हाण यांनी पत्रकार परिषदेतच त्यांची सून गौरी चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्या संवादातील एक ऑडियो क्लिप लावली. या क्लिपमध्ये चित्रा वाघ सुनेला माझ्याविरोधात भडकवत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. सुनेला सर्व मदत करण्याचे ते बोलत असल्याचे सांगत असल्याचेही चव्हाण म्हणाल्या.

फडणवीस यांच्या सांगण्यावरून यांनी हे केल्याचा दावा विद्या चव्हाण यांनी केला आहे. सहा महिन्यांपूर्वी आपल्याला ही ऑडियो क्लिप मिळाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. चव्हाण यांनी वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Chitra Wagh Vidya Chavan
Nitin Gadkari: गडकरीसाहेबांच्या विकासाच्या 'व्हिजन'ला दृष्ट लावताहेत हे खड्डे

माझ्या कुटुंबाचा राजकारणाशी संबंध नसताना त्यांचा राजकारणासाठी वापर केल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान, आता चित्रा वाघ त्यांना काय प्रत्युत्तर देणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com