महेश जगताप
Mumbai : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यात शाब्दिक खडाजंगी पाहायला मिळाली. सभागृहात गोपीचंद पडळकर यांनी कागद फाडले. त्यावर उपसभापतींनी तीव्र नाराजीही व्यक्त केली. बराच वेळ पडळकर आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यात वाद सुरू होता. अखेर विरोधी पक्षातील आमदार अंबादास दानवे, सचिन अहिर यांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी उपसभापतींनी पडळकरांवर कारवाईचा बडगा उगारला.
हे वादावादीचं प्रकरण शांत होत नाही तोच विधानपरिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे आणि आमदार अनिल परब यांच्यात गुरूवारी चांगलाच कलगीतुरा झाला. त्याला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस निमित्त ठरले. उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) गटाच्या विधान परिषदेच्या सर्व आमदारांना मातोश्रीला ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी जायचे होते.
यासाठीच अनिल परब यांनी सहा वाजताच सभागृह तहकूब करावी ही मागणी उपसभापतींकडे केली होती. मात्र, गोऱ्हे यांनी ती फेटाळली. त्यामुळे परब यांचा पारा चढून त्यांनी आपणच जरवर्षी हा प्रस्ताव मांडत होता, मग आज काय झाले असा सवाल केला.
शिवसेनेचे सर्व आमदारांनी यावेळी आज सहा वाजता सभागृहाचे कामकाज स्थगित करावे यासाठी जोराने मागणी केली. यावर भाजपचे सदस्य प्रवीण दरेकर(Pravin Darekar) यांनी ज्या सदस्यांना जायचे असेल त्यांनी जावे, सभागृह दैनंदिन कामकाज संपेपर्यंत सुरुच राहील अशी भूमिका मांडली. दरेकरेंच्या या भूमिकेमुळे ठाकरे गटाचे अनिल परब, सचिन अहिर व इतर सदस्य चांगलेच भडकले.
याच मुद्द्यावर ठाकरे गट व भाजप सदस्य यांच्यात ताणाताणी झाली. त्याला प्रतिउत्तर देताना गोऱ्हे यांनी आपण कामकाज संपल्यानंतरही जाऊ शकता त्यामुळे आत्ता घाई करू नका,आजचे कामकाज बरेच शिल्लक असून मी सभागृह स्थगित करणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे सभागृहात शिवसेनेच्या सर्व आमदारांनी गदारोळ घातला. त्यानंतर परब यांनी आम्हीही लवकर जात नाही आजचे सर्व कामकाज घ्यावे अशी ताठर भूमिका घेतली.
मंत्री अतुल सावे(Atul Save) हे गृहनिर्माण विभागासंबधीचे बिल मांडत असताना ठाकरे गटाच्या सदस्यांनी त्यांच्यावर प्रश्नाचा भडीमार केला. त्यांना हे बिल आणण्यामागील कारण काय हे विचारण्यात आले. परंतू, मंत्री सावे यांना याबद्दल फारसे काही सांगता आले नाही. शेवटी सभापती नीलम गोऱ्हे यांनी हस्तक्षेप करत उपमुख्यमंत्री या बिलासंदर्भात सविस्तर निवेदन करतील असे सांगितले.
त्यानंतर सभागृह दहा मिनिटे तहकूब करत ठाकरे गटा(Thackeray Group)च्या सदस्यांना दालनात बोलावून उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जाता यावे याकरिता तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.