Devendra Fadnavis  Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis : मोठी अपडेट! 'स्थानिक'च्या निवडणुकीचा मुहूर्त ठरवणार CM फडणवीसांकडचा 'तो' मोठा अधिकार

Maharashtra Political Updates : विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता महायुतीसह महाविकास आघाडीतील नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी CM देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीतील भाजपच्या अधिवेशनात बोलताना या निवडणुका मे महिन्यात होणार असल्याचे संकेत दिले होते.

Jagdish Patil

Mumbai News, 17 Jan : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Assembly Election) पार पडल्यानंतर आता महायुतीसह महाविकास आघाडीतील नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीतील भाजपच्या अधिवेशनात बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीस सज्ज राहण्याच्या सूचना देत या निवडणुका मे महिन्यात होणार असल्याचे संकेत दिले होते.

अशातच आता स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणुकीचे महत्वाचे अधिकार घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीसांकडे (Devendra Fadnavis) आला आहे. कारण गुरूवारी (ता.16) मुंबईत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांना राज्य निवडणूक आयुक्त पदाच्या उमेदवाराची शिफारस करण्याचे सर्वाधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला.

याबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी स्थानिकच्या निवडणुकांबाबतचे अनेक निर्णय आता फडणवीसांकडेच राहणार आहेत. याआधी राज्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाला राज्य निवडणूक आयुक्त पदासाठी मुख्यमंत्र्यांकडे नावाची शिफारस करण्याचे अधिकार होते. मंत्रिमंडळाने शिफारस केल्यानंतर मुख्यमंत्री ते नाव राज्यपालांकडे पाठवायचे.

मात्र, कालच्या निर्णयामुळे आता मुख्यमंत्री राज्यपालांना थेट उमेदवाराची शिफारस करू शकतात. सध्या राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकीय राजवट आहे. मागील अनेक दिवसांपासून रखडलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांत होण्याची शक्यता असतानाच मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय महत्वाचा ठरणार आहे. कारण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाद्वारे घेण्यात येतात.

महायुती निवडणुकीसाठी सज्ज

दरम्यान, आता विधानसभा निवडणुकीत महायुतीने (Mahayuti) मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे महायुतीचा आत्मविश्वास वाढला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्याचा आदेश पंतप्रधान मोदींनी महायुतीच्या नेत्यांना दिला आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायती, नगरपालिका, जिल्हा परिषदा व महापालिकांपासून संसदेपर्यंत भाजपच्या विजयाचा झेंडा फडकत राहिला पाहिजे, असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT