Narendra Modi : 'स्थानिक'साठी महायुतीत स्वबळाचं टुमकं वाजवणाऱ्यांना PM मोदींचा मोठा झटका; मित्रपक्षांना सांभाळण्याचा का दिला सल्ला...

PM Modi advice to alliance partners : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वबळावर लढायला हवे, असे विचार राज्यातील भाजपचे नेते करू लागले व बोलू लागले आहेत, त्यांना योग्य तो संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे महायुतीचा आत्मविश्वास वाढल्यामुळे आता आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वबळावर लढायला हवे, असे विचार राज्यातील भाजपचे नेते करू लागले व बोलू लागले आहेत, त्यांना योग्य तो संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत पार पडलेल्या महायुतीच्या सर्व मंत्र्याच्या व आमदारांच्या बैठकीत दिला.

भाजपच्या (BJP) नेतेमंडळीने केंद्रातील राजकारण आधी समजून घेतले पाहिजे. संसदेत भाजपला मित्र पक्षाची असलेली गरज लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे मित्र पक्षांना सांभाळून घेणे हे कर्तव्य झाले आहे. हे मोदीसह पक्षातील सर्वच नेते निश्चितपणे जाणतात. महायुतीमधील तीन पक्षाने मिळून काम केले तरच आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय सोपा जाणार आहे. त्यामुळे तीन पक्षांनी समन्वयाने व एकत्रित काम करण्याचा सल्ला पीएम मोदी यांनी दिला. त्याची अंमलबजावणी नजीकच्या काळात कशी होते? यावरच महायुतीचे यश-अपयश आणि महायुतीचे संबंध अवलंबून राहतील, असा कानमंत्रच मोदींनी या बैठकीत दिला.

Narendra Modi
Saif Ali Khan Attacked : सैफच्या घरात आरोपी कसा शिरला, काय होता उद्देश? पोलिसांना लागला सुगावा...

सामान्य जनता बोलत नाही पण जिथे तिथे तुमच्या प्रत्येकाचे बारीक लक्ष असते. तेव्हा चांगली प्रतिमा जपा, कसलाच बडेजाव करू नका, साधे राहा, मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या फाइली घेऊन फिरू नका. एकत्र राहून काम करीत महायुतीचा धर्म पळून पुढे जावा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या आमदाराच्या बैठकीत दिला. त्याचवेळी दुसरीकडे आमदार व मंत्र्यांची मते जाणून घेतली. मोदी यांनी यावेळी काही सूचना केल्या.

Narendra Modi
Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्याप्रकरणात मोठी अपडेट; विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात; मोठे कारण आले समोर..

पीएम मोदी (Narendra Modi) यांनी भाजपच्या आमदारांशी भावनिक संवाद साधताना काही कठोर मते व्यक्त केली. यावेळी त्यांनी पैसा नाही तर चांगली प्रतिमा महत्वाची आहे. केवळ स्वतःच्या फायदाचा विचार न करता संपूर्ण मतदारसंघाचा विचार करा. मतदारसंघातील ग्रामीण भागात जावा त्याठिकाणी रहा, नागरिकांत मिळून मिसळून त्यांच्या समस्या सोडवा, केवळ विनाकारण फिरू नका, अशा शब्दांत त्यांनी सगळ्यांचे कान टोचले.

Narendra Modi
Suresh Dhas News : मंजिली कराडांच्या चॅलेंजनंतर सुरेश धसांची प्रतिक्रिया आली समोर; म्हणाले, 'भगिनीच्या आरोपांवर....'

तीन पक्षाने लोकसभा, विधानसभा निवडणुकीत एक दिलाने काम केले त्याचा फायदा झाला. त्याच दृष्टीने आता येत्या काळात व्यापक विचार करून निर्णय घ्यावेत, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. पुढील पाच वर्षाच्या काळात सामान्य व्यक्तीना केंद्रस्थानी ठेऊन कार्य करत रहावे. केवळ रस्ते, पुलाचे बांधकाम म्हणजे विकास या संकुचित वृत्तीतून बाहेर पडण्याचा सल्लाही मोदी यांनी यावेळी दिला. त्यांनी यावेळी साधेपणाचा आग्रह धरतानाच प्रत्येकांनी स्वतःची प्रतिमा जपावी, प्रत्येकानी वैयक्तिक चरित्र जपण्यासह चांगल्या प्रतिमेसाठी जे-जे करणे शक्य आहे ते करत राहावे, असा सल्ला दिला आहे.

Narendra Modi
Saif Ali Khan Attack : "एकाची हत्या आणि दुसऱ्याच्या..."; सैफवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचं CM फडणवीसांकडे बोट

आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वबळावर लढायला हवे, असे विचार राज्यातील भाजपचे नेते करू लागले व बोलू लागले आहेत, त्यांना योग्य तो संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिला आहे. केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्याठिकाणी भाजपला मित्रपक्षाची मदत झाली आहे. हे विसरून चालणार नाही. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत वेगळे करून चालणार नाही, त्या सर्व मित्रपक्षांना सोबत घेऊनच स्थनिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याऐवजी एकत्र लढण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

Narendra Modi
Saif Ali Khan Attack : सैफ अली खान हल्ला प्रकरणात 'या' एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्याची एन्ट्री, जाणून घ्या त्यांची हिस्ट्री

पीएम मोदी यांनी मार्गदर्शन करताना आमदारांना मोलाचा सल्ला दिला. त्यामुळे येत्या काळात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना तीन पक्षाने याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली तर सरकारला मोठे यश मिळवणे कठीण नसणार आहे. त्यामुळे येत्या काळात मोदींनी दिलेल्या या कानमंत्रांची अंमलबाजवणी कशा प्रकारे केली जाते? यावर सर्वकाही अवलंबून असणार आहे.

Narendra Modi
NCP Politics : अजितदादांचा धनंजय मुंडेंना धक्का, दिल्लीच्या निवडणुकीसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com