Mangeshc Chivate  sarkarnama
मुंबई

Mangesh Chivate : एकनाथ शिंदेंच्या विश्वासूला सीएम फडणवीसांनी हटवलं, पत्र लिहून म्हटले, 'एकही दिवस सुट्टी नाही...'

Mangesh Chivate Devendra fadnavis Eknath Shinde : मंगेश चिवटे यांनी रामेश्वर नाईक यांचे अभिनंदन करत रुग्ण, रुग्णसेवक, रुग्णांचे नातेवाईक यांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Roshan More

Mangesh Chivate News: महायुतीच्या सरकार स्थापनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली टीम बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आपल्या सचिवपदी श्रीकर परदेशी यांची नियुक्ती केली त्यानंतर मागील सरकारच्या काळात रुग्णांसाठी संजीवनी ठरलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या प्रमुखपदी रामेश्वर नाईक यांची नियुक्ती केली आहे. या पदावर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांचे विश्वासू मंगेश चिवटे होते.

मंगेश चिवटे यांनी रामेश्वर नाईक यांचे अभिनंदन करत रुग्ण, रुग्णसेवक, रुग्णांचे नातेवाईक यांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पत्रात चिवटे म्हणाले आहे की, मागील अडीच वर्षात लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारच्या माध्यमातून सेवा करण्यास मला मिळालेली संधी ही ईश्वरकृपेने मी संपूर्ण प्रामाणिकपणे आणि ध्येयवेड्या पद्धतीने निभावली. याचा मला मनोमन आनंद व अभिमान आहे.

419 कोटी अर्थसहाय्य वितरीत

एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मागील अडीच वर्षामध्ये, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षा अंतर्गत, कक्ष प्रमुख म्हणून कार्यरत असताना आमच्या निस्वार्थी टीमच्या साथीने एकूण 419 कोटी पेक्षा अधिक अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले. यामुळे 51 हजारपेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचले. (रुग्णांच्या मदतीसाठी एकुण 381 कोटी 20 लाख रुपये, तर नैसर्गिक आपत्ती घटनांमध्ये नुकसान भरपाई मदत म्हणुन 38 कोटी 66 लक्ष रुपये वितरीत करण्यात आले).

एकही दिवस सुट्टी नाही

चिवटे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की,गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे कामकाज रोज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत दररोज सुमारे 12 तास सुरु असे. सर्वात महत्वाचे म्हणजे गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या सहकाऱ्यांनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. सुट्टीच्या दिवशी शनिवारी रविवारी देखील कामकाज सुरू असे. अगदी सण-उत्सवाच्या काळात देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या सहकाऱ्यांनी काम केले. त्याबद्दल मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधील सर्व निस्वार्थीपणे काम करणाऱ्या सहकाऱ्यांचा मी आयुष्यभर ऋणात राहील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT