Eknatha Shinde sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : कट्टर शिवसैनिक मैदान सोडत नाही अन् विचारही; मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना डिवचले

Sachin Waghmare

Mumbai News : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या भाषणाची सुरुवात ही, 'जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो ही गर्जना करून करत होते. तेव्हा माझ्यासकट सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहात होते. गर्व से कहो हम हिंदू है ही सिंह गर्जना बाळासाहेबांनी देशाला दिली. पण काही जणांना या शब्दाची अलर्जी झाली आहे. हिंदूहृदयसम्राट म्हणताना काही जणांची जीभ कचरत आहे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यांपासून शिवसेना (Shivsena) आपण मुक्त केली. त्यामुळे आझाद शिवसेनेचा हा आझाद मेळावा आहे. कट्टर शिवसैनिक मैदानही सोडत नाही अन विचारही सोडत नाही, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना डिवचले. आझाद मैदानावर शिवसेनाचा दसरा मेळावा शनिवारी आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. (Eknath Shinde News)

बाळासाहेब म्हणाले होते, अन्याय सहन करू नका. जेव्हा अन्याय होऊ लागला तेव्हा आम्ही उठाव केला. आम्ही उठाव केला नसता तर शिवसैनिकांचं खच्चीकरण झालं असतं. सच्च्या शिवसैनिकांचा अपमान झाला असता. महाराष्ट्र अनेक वर्ष मागे गेला असता. आपलं सरकार सत्तेवर आल्यावर महाराष्ट्र नंबर वन आणण्याचं काम आपण केलं. महाविकास आघाडी असताना सरकार तिसऱ्या नंबरवर होतं. सहा महिन्यात आपण पहिल्या नंबरवर राज्य आणले, असल्याचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले.

अडीच वर्षांपूर्वी आघाडीचे सरकार पाडले आहे. तेव्हा काही लोक म्हणत होते. हे सरकार १५ दिवस टिकणार नाही. एका महिन्यात पडेल, सहा महिन्यात पडेल. पण टीका करणाऱ्यांना आम्ही पुरुन उरलो आणि जनतेच्या आशीर्वादाने साथीने घासून नाही पुसून नाही तर ठासून दोन वर्ष पूर्ण केली. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आनंद दिघेंचा चेला आहे. असा स्वस्तात जाणार नाही. मला हलक्यात घेऊ नका. मी मैदानातून पळणारा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महायुती सरकार हे वीज मोफत देणार सरकार आहे. एका वर्षात सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. एकीकडे कल्याणकारी योजना थांबल्या होत्या. लाडकी बहीण योजना, तीर्थ दर्शन योजना राबवल्या आहेत. लपून बसलेला हा मुख्यमंत्री नाही. तर लोकांच्या कल्याणासाठी रस्त्यावर उतरणारा हा मुख्यमंत्री आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

माविआ सरकार असताना राज्य तिसऱ्या क्रमांकावर होत पण आपण सरकार पहिल्या नंबरवर आणले आहे. अनेक योजना शेतकऱ्यांना दिल्या आहेत. मोफत वीज, १० लाख लाडक्या भावांना प्रशिक्षित करणारे पैसे दिले, मेट्रो अटल सेतू केला आहे. अडीच वर्षात अनेक निर्णय सरकारने घेतले आहेत कुठे होतो आणि कुठे आलो आहोत, ते पहा. कोविडला घाबरून बसणार मुख्यमंत्री मी नाही, लोकात जाणारा आहे. अनेक कामाना माविआ काळात ब्रेक लागला,इथ ब्रोकर नव्हता तर स्पीड ब्रेकर केले,आम्ही स्पीड ब्रेकर उखडून टाकली आणि नवीन सरकार आणले असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT