Devendra Fadnavis, Aditya Thackeray, Uddhav Thackeray
Devendra Fadnavis, Aditya Thackeray, Uddhav ThackeraySarkarnama

Aditya Thackeray : "लाडकी बहीण योजनेचे पोस्टर बघितलं तरी इगो दुखावतोय..." आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Aditya Thackeray On Devendra Fadnavis Mumbai Metro 3 : "देवेंद्र फडणवीसांना चुकीची माहिती मिळाली असेल किंवा त्यांना जनतेची दिशाभूल करायची असेल. कारण महाविकास आघाडीच्या काळात मेट्रो तीनचं काम एक दिवसही थांबलं नव्हतं. मात्र, आम्ही आरे कारशेड हलवली होती. कारण आम्हाला जंगल नष्ट करायचं नव्हतं."
Published on

Mumbai News, 06 Oct : "कोणाच्या तरी गर्वाचे हरण करणारी मेट्रो थ्री असून या मेट्रोचं काम महाविकास आघाडीने थांबवलं होतं. उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) कोणता इगो दुखावला माहिती नाही, त्यांनी या मेट्रोच्या कामाला स्थिगिती दिली."

असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर केला होता. तर फडणवीसाच्या याच आरोपाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

लाडकी बहीण योजनेचे पोस्टर बघितलं तर इगो कुणाचा दुखावतोय, हे कळेल, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) फडणवीसांना डिवचलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना जनतेची दिशाभूल करायची असेल म्हणून असं वक्तव्य केल्याचा आरोप केला, शिवाय महाविकास आघाडीच्या काळात मेट्रो तीनचं काम एक दिवसही थांबलं नव्हंत असंही त्यांनी सांगितलं.

Devendra Fadnavis, Aditya Thackeray, Uddhav Thackeray
Sanjay Raut Politics: संजय राऊत यांना शिवसेनेवर भरोसा नाय काय?.. अनिल गोटे यांच्याशी उमेदवारीची चर्चा?

आदित्य ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) चुकीची माहिती मिळाली असेल किंवा त्यांना जनतेची दिशाभूल करायची असेल. कारण महाविकास आघाडीच्या काळात मेट्रो तीनचं काम एक दिवसही थांबलं नव्हतं. मात्र, आम्ही आरे कारशेड हलवली होती.

कारण आम्हाला जंगल नष्ट करायचं नव्हतं. परंतु त्यांना आता पुन्हा जंगल नष्ट करायचं असून कांजूरमार्गची जागा अडाणींच्या घशात घालायची आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. तर लाडकी बहीण योजनेचे पोस्टर बघितलं तर इगो कुणाचा दुखावतोय, हे कळेल अशा शब्दाच फडणवीसांच्या आरोपावर टोलाही लगावला.

Devendra Fadnavis, Aditya Thackeray, Uddhav Thackeray
Ashok Chavan News : एका पराभवाने वासे फिरले, अशोक चव्हाणांना मोदींची भेट, पण चिखलीकरांना प्रवेश नाही

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

शनिवारी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले, "मेट्रो तीन ही कोणाच्या तरी गर्वाचे हरण करणारी आहे. या मेट्रोला महाविकास आघाडीने रोखलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, ही मेट्रो ग्रीन एनर्जीला चालना देणारी आहे. तरीही उद्धव ठाकरेंचा कोणता इगो दुखावला माहिती नाही, त्यांनी या मेट्रोच्या कामाला स्थिगिती दिली."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com