'काही प्रादेशिक पक्ष आगामी काळात काँग्रेसमध्ये विलीन होतील,'असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी (Sharad Pawar) नुकतेच केले. पवारांच्या या विधानाचे पडसाद राज्यात उमटत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm Eknath Shinde) यांनी पवारांच्या काँग्रेस विलीनीकरणाच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
पराभव दिसत असल्यामुळे पवारांनी असं विधान केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. पवार अभ्यास करूनच वक्तव्य करतात त्यामुळे त्यांनी केलेलं वक्तव्य हे सत्य आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी पवारांची खिल्ली उठवली आहे.
नंदुरबारच्या आजच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष नकली असल्याचे म्हटलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची देखील पवार आणि ठाकरेवर सडकून टीका केली आहे.पाकिस्तानची भाषा बोलणारे एकत्र आले आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.
मोदी यांनी नंदुरबारच्या सभेत शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ‘एनडीए’मध्ये सहभागी होण्यासाठी सुचविले. या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, "मोदी यांचा संसदीय लोकशाहीवर विश्वास नाही. महात्मा गांधी, पंडित नेहरू यांची विचारधार ही देशाला एकत्र ठेवणारी, ऐक्याची आहे. त्या विचारांनीच आपल्याला पुढे जावे लागेल,"
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मोदी यांची नुकत्याच झालेल्या काही जाहीर सभांमधील भाषणे पाहता, ते एखाद्या विशिष्ट समाजाबाबत विधाने करीत आहेत. त्यातून समाजात गैरसमज पसरत आहेत. त्यामुळे त्यांच्यासमवेत जाण्याचा प्रश्नच उदभवत नाही. लोकसभा निवडणुकीचे पहिले तीन टप्पे झाले आहेत. त्या बद्दल विविध अंदाज व्यक्त होत आहेत. त्यामुळे मोदी अस्वस्थ झाले असावेत. त्यातूनच ते अशी वक्तव्ये करीत असावेत, असेही पवार यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.