Cm Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

शिंदे सरकारचं पहिलं पावसाळी अधिवेशन बुधवारपासून ; विरोधक-सत्ताधारी येणार आमनेसामने

Eknath Shinde | २४ ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिंदे सरकारचं (eknath shinde) पहिलं पावसाळी अधिवेशन बुधवारपासून (ता.१७) मुंबई येथे सुरु होणार आहे. ता. १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार असून आहे. या अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. १६ तारखेला याबाबत विरोधकांची रणनीती ठरणार आहे.

विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. २४ ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, दादा भुसे, उदय सामंत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते. या बैठकीत पावसाळी अधिवेशन विधानपरिषद व विधानसभा बैठकांची तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली.

शिवसेनेचे औरंगाबादचे आमदार अंबादास दानवे यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. मात्र, त्याला महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेता आम्हालाच मिळाला पाहिजे, दुर्दैवाने शिवसेनेने आम्हाला याबाबत विचारणा देखील केली नाही, अशी नाराजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. जळगावात ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, आज विरोधक शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.

"विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे तर विधानसभेमध्ये उपसभापतीपद शिवसेनेकडे आहे. त्यामुळे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पद हे आम्हाला मिळाला पाहिजे, अशी आमची आग्रही भूमिका आहे" असे थोरात म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT