Rohit Pawar : फडणवीसांची कार्यशैली अजितदादांसारखीच : रोहित पवारांनी केलं कौतुक

एमपीएससीच्या (MPSC) कक्षेबाहेरीलही सर्व जागा दुय्यम सेवा मंडळामार्फत न भरता #MPSC मार्फतच भराव्यात यासाठी रोहित पवार यांना पत्र दिले होते.
Rohit Pawar,  Devendra Fadnavis
Rohit Pawar, Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

पुणे : महाराष्ट्र सरकारातील नोकरभरतीची प्रक्रिया लोकसेवा आयोगाकडून (MPSC Exam) काढून दुय्यम सेवा मंडळांकडे वर्ग केली जाण्याच्या हालचाली सुरु होत्या. याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले होते.

एमपीएससीच्या (MPSC) कक्षेबाहेरीलही सर्व जागा दुय्यम सेवा मंडळामार्फत न भरता #MPSC मार्फतच भराव्यात यासाठी रोहित पवार यांना पत्र दिले होते. याबाबत निर्णय स्थगित केला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. याबाबत फडणवीसांचे रोहित पवारांनी कौतुक केले आहे. फडणवीसांच्या कामाची तुलना रोहित पवारांनी अजित पवार यांच्या कामासोबत केली आहे.

रोहित पवार यांनी याबाबत फेसबूक पोस्ट केली आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, "MPSC च्या कक्षेबाहेरीलही सर्व जागा दुय्यम सेवा मंडळामार्फत न भरता #MPSC मार्फतच भराव्यात यासाठी उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis साहेबांना पत्र दिलं.फडणवीस साहेबांशी वैचारिक मतभेद असले तरी त्यांची कार्यशैली अजितदादांसारखीच भारावणारी असल्याची बाब त्यांच्याशी चर्चा करताना ठळकपणे जाणवते,"

Rohit Pawar,  Devendra Fadnavis
जालना येथे सापडले 390 कोटींचे घबाड ; 58 कोटींची रोकड अन् 32 किलो दागिने

मुळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारखी स्वतंत्र यंत्रणा असताना आणि लोकसेवा आयोग नोकरभरती राबवण्याविषयी सकारात्मक असताना सरकार ही नोकरभरती दुय्यम सेवा मंडळामार्फत घेण्याचा घाट का घालत आहे, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

दुय्यम सेवा मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या नोकरभरतीत अनेक गैरप्रकार झाल्यामुळे त्यांच्यामार्फत भरती बंद करण्यात आली होती, पण आता सरकार पुन्हा तोच कित्ता गिरवू पाहात आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे यंत्रणा आहे आणि आजवर त्यांच्याकडून झालेल्या नोकरभरतीत गैरप्रकार झाल्याचे एकही उदाहरण नाही, त्यामुळे आयोगालाच कार्यक्षम व गतिशील करून नोकरभरती प्रक्रिया आयोगामार्फत राबवावी, असे मत अनेकांनी व्यक्त केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com