Marathi Language Elite Status Sarkarnama
मुंबई

Marathi Language Elite Status: पवारांनी चिमटा काढल्यानंतर CM शिंदे लागले कामाला; 'मराठी'ला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार?

Mangesh Mahale

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यावरुन आतापर्यंत अनेक निवडणुका लढल्या गेल्या. पण प्रत्यक्षात निर्णय प्रलंबित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावरुन शिंदे-फडणवीस-पवार सरकारला चिमटा काढला होता. त्यानंतर सरकार पुन्हा कामाला लागले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. मराठीला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे मागणी केली होती.आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाह्या सरसावल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणार, यांची सध्या जोरदार चर्चा आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता झाली शिंदे सरकारने केली असल्याची माहिती आहे. राज्य सरकारने संबधित विभागाला पत्र लिहून याबाबतचा आढावा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारत सरकारने आत्तापर्यंत ६ भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे. तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगु, मल्याळम आणि उडिया या भाषांना अभिजात दर्जा मिळाला आहे.

अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे.केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष ठरवलेले आहेत. भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे, भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या-त्या राज्याला भरीव अनुदान मिळते.

शरद पवार काय म्हणाले ...

मराठी भाषेतील साहित्य आणि कविता संत तुकारामाचे अभंग साता समुद्रापार पोहचले आहेत. यावर शरद पवारांना प्रश्न विचारला की मराठी भाषेला केंद्र सरकारने अद्याप अभिजात भाषेचा दर्जा का दिलेला नाही? या प्रश्नावर शरद पवार यांनी आपले मत मांडले.

मराठीला अभिजात दर्जा मागण्याचा अधिकार मराठी भाषेच्या प्रेमींचा आणि मराठीजनांचा आहे. मराठी कार्यक्रमाच्यामध्ये असे आमचे उद्योग असतात की ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण होते. ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबा यांनी साहित्याच्या माध्यमातून मराठीत प्रचंड धैर्य निर्माण केले आहे. त्यांनी जे साहित्य लिहिलेले आहे, त्याला जनमत आहे. त्यामुळे मराठीच्या भाषेला अभिजात साहित्याचा दर्जा मिळालाच पाहिजे, असे पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT