Video Uddhav Thackeray: पवार-पटोलेंना 'शॉक'; उद्धव ठाकरेंचा नवा डाव ; मित्रपक्षांच्या मतदारसंघावरच घाव

Thackeray Group Claims 25 out of 36 Assembly Seats In Mumbai: वांद्रे पूर्व मधून वरुण सरदेसाई तर दहिसर मधून तेजस्वी घोसाळकर यांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे.
Mahavikas Aghadi CM candidate
Mahavikas Aghadi CM candidatesarkarnama
Published on
Updated on

मुंबई: लोकसभा निवडणुकीत सत्ताधीश 'शिंदे-पवार-फडणवीसांना 'जादू' दाखविल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता विधानसभा निवडणुकीतही जलवा करण्याच्या प्रयत्नात आहेत.

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीपेक्षा येत्या निवडणुकीत आणखी २० आमदार वाढण्याचे ठाकरेंचे टार्गेट आहे. म्हणजे, मागील निवडणुकीतील ५५ आमदारांची संख्या आता ७०-७५ करण्याचा ठाकरेंचा हिशेब आहे. यासाठी ठाकरेंनी मुंबईवरच भरवसा ठेवला आहे.

मुंबई आणि उपनगरांमधील ३६ पैकी २५ जगांवर डोळा ठेवून, २०-२२ आमदार निवडून आणण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. या २५ जागांमध्ये ठाकरेंनी मित्रपक्ष राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेसच्या जागांवर दावा ठोकला आहे.

जागा वाटपाचा फॉम्युला ठरला नसतानाच ठाकरेंनी थेट २५ जागा घेण्याच्या हालचाली सुरू केल्याचे समजते. त्यामुळे जागा वाटपाच्या चर्चेआधीच महाविकास आघाडीत धूसफूस होण्याची चिन्हे आहेत.

लोकसभा निवडणुकीतील निकालाचा आधार घेऊन आणि त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील तगडे उमेदवार पाहता, ठाकरेंनी २५ जागांचे गणित जुळवल्याचे दिसत आहे. त्याच,निवडून येण्याच्या निकषावर जागा वाटल्या जातील, असेही सांगून खासदार संजय राऊतांनी ठाकरेंनी ठरविलेल्या मुंबईतील प्लॅनला बळ दिले आहे. दुसरीकडे, थेट तेही येथे मित्रपक्षाचे आमदार आहेत, अशा जागाही लढविण्याचा ठाकरेंचा पवित्रा असल्याने दोन्ही कॉग्रेसचे 'टेन्शन'वाढणार, हे नक्की.

विधानसभेसाठी उद्धव ठाकरे गट मुंबईत आपल्या मित्रापक्षांना फक्त 11 जागा सोडण्याची विचारात आहेत. मुंबईतल्या जास्ती जास्त म्हणजे 25 जागांवर ठाकरे गटाने दावा केला आहे. त्यात चेंबूर, भांडुप पश्चिम,शिवडी, भायखळा ,वरळी, माहीम, विक्रोळी, मागाठाणे,जोगेश्वरी पूर्व,दिंडोशी, अंधेरी पूर्व ,कुर्ला, कलिना,दहिसर,गोरेगाव, वर्सोवा, वांद्रे पूर्व,विलेपार्ले, कुलाबा, वडाळा, चांदीवली, बोरिवली, मलबार हील, अणूशक्ती नगर, मानखुर्द शिवाजीनगर मतदार संघाचा समावेश आहे.

Mahavikas Aghadi CM candidate
Video Thackeray Group: बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंना मुंबईत हव्यात आहेत इतक्या जागा

ठाकरे गटाने आपल्या मित्रपक्षांच्या मतदार संघावरही दावा ठोकला आहे. त्यात चांदीवली, अणूशक्तीनगर, मानखुर्द शिवाजीनगर, चेंबूर , वांद्रे पूर्व या मतदार संघाचा समावेश आहे. चांदीवली मतदार संघ हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नसिम खान यांचा मतदार संघ आहे. ते या मतदार संघातून गेल्या वेळी केवळ 400 मतांनी पराभूत झाले होते. याठिकाणी शिवसेनेचे दिलीप लांडे विजयी झाले. लांडे आता शिंदे गटात आहेत.

अणूशक्तीनगर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. येथे नवाब मलिक हे आमदार आहेत. त्यामुळे या मतदार संघावरून वाद होण्याची शक्यता आहे. मानखुर्द शिवाजी नगर मतदार संघातून समाजवादी पार्टीचे अबू आझमी हे आमदार आहेत. वांद्रे पूर्वमध्ये काँग्रेसचे झिशान सिद्दिकी हे निवडून आले आहेत.

तरुणांना संधी

आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून तरुणांना संधी देण्यात येणार आहे. वांद्रे पूर्व मधून वरुण सरदेसाई तर दहिसर मधून तेजस्वी घोसाळकर यांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे. अनेक नव्या चेहऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून संधी मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com