Eknath Shinde , Abdul Sattar Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde on Abdul Sattar : मुख्यमंत्र्यांनी सत्तारांचे कान टोचले ; कारभार सुधारा ; तुमचे जे चालले ते वाईट..

Abdul Sattar News : सत्तारांनी हात जोडल्यााने मुख्यमंत्री काहीसे शांत झाले,

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : शिंदे गटाचे नेते कृषिमंत्री अब्दुल सत्तार सध्या चर्चेत आहेत. अकोला जिल्ह्यात बियाणे विक्रेत्यावर बेकायदा धाडी टाकल्याचे प्रकरण त्यांच्या अगंलट आले आहे. यावरुन विरोधकाकडून चौफेर टीका होत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीही सत्तारांचे कान टोचले आहे. सत्तारांकडून त्यांनी स्पष्टीकरण मागितले आहे.

काल बुधवारी (ता. १३) मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगले खडसावले. सत्तार यांना अकोला जिल्ह्यातील छाप्याचे प्रकरण महागात पडणार, असल्याचे सध्याचे चित्र आहे. सत्तारांनी हात जोडल्यााने मुख्यमंत्री काहीसे शांत झाले, असे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.

अकोला जिल्ह्यात बियाणे विक्रेत्यावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने आठ दिवसापूवी छापे टाकले होते. त्या पथकामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा स्वीय सहायक सामील होता. त्यांनी खंडणी मागितल्याचा आरोप आहे. यावरून गेले दोन दिवस राज्यातील राजकारण पेटलं आहे.

"सत्तार, तुमचे जे चालले आहे, ते वाईट आहे. कारभार सुधारा, असा बेबंदपणा बरा नव्हे. तुम्ही सरकारची पत धुळीला मिळवताय, या शब्दात मुख्यमंत्र्यांनी सत्तार यांना झापले. त्यावर सत्तार हात जोडून होय साहेब, म्हणाले. तेलंगणातील कायद्याचा मुद्दा काढून सत्तारांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण ‘काय कारभार करता, सरकारची पत तुम्ही धुळीला मिळवताय’, या शब्दात सत्तारांना पक्षातील वरिष्ठांनी छापले असल्याची माहिती आहे.

मंगळवारी दुपारी सह्याद्री अतिथीगृहात मंत्रिमंडळ बैठकीचे कामकाज संपले. त्यानंतर मंत्रिमंडळात अनौपचारिक चर्चा झाली. त्यात कृषी विभागाच्या छाप्याचे जे प्रकरण समोर आले. तो गंभीर विषय असल्याचे फडणवीस म्हणाले. त्यानंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी त्यात उडी घेतली. "मान्सून आला आहे. बियाणे आणि खतांची शेतकऱ्यांना मोठी गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर असे घडणे योग्य नाही," असे महाजन म्हणाले.

अकोला येथे कृषी विभागाच्या पथकाने बोगस बियाणे विक्रेत्यांवर ठाकलेल्या धाडीचे प्रकरण अंगलट आल्यानंतर सत्तार यांनी कृषी विभागाने धाड टाकलेल्या पथकातील दिपक गवळी नावाची व्यक्ती ही आपला पीए नसल्याचे माध्यमांना जाहीर सांगितले होते. पण काल दिपक गवळी हा आपला पीए नाही अशी भूमिका देखील सत्तार यांनी दलली. तो माझा पीएच असल्याचे सत्तार यांनी सांगितले.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT