Raj Thackeray birthday : राज ठाकरेंनी वाढदिवसानिमित्त मनसैनिकांकडून मागितले 'हे' खास गिफ्ट

MNS News : खुद्द राज ठाकरेंनीच पदाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उद्या (ता.१४) वाढदिवस. यानिमित्ताने राज ठाकरेंनी यांनी फेसबूक पोस्ट केली आहे. त्यांनी मनसैनिकांना एक आवाहन केले आहे. याबाबतचे एक पत्रच राज ठाकरेंनी आपल्या मनसैनिकांसाठी लिहिले आहे. (MNS Raj Thackeray appeal to office bearers on the occasion of his birthday)

राज ठाकरे यांच्या वाढदिवशीनिमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून मुंबईत 'शिवतीर्थ'बंगल्यावर दाखल होत असतात. अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मनसैनिक हे पुष्पगुच्छ आणि मिठाई घेऊन दाखल होतात. यंदा आपल्या वाढदिवसानिमित्ताने काय भेट आणायची याबाबत खुद्द राज ठाकरेंनीच पदाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. त्यांच्याकडून एका खास भेटवस्तूची मागणी केली आहे.

Raj Thackeray
Alandi Warkari Viral Video: आम्हाला एकांतात नेऊन मारलं ? ; वारकऱ्यांचा गंभीर आरोप ; आळंदीत नेमकं काय घडलं ; Video व्हायरल..

"यावेळी शुभेच्छा द्यायला येताना कोणीही पुष्पगुच्छ किंवा मिठाई न आणता येताना एखाद्या झाडाचे रोप किंवा शैक्षणिक साहित्य घेऊन यावे," असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. वाढदिवसानिमित्त जमणारे साहित्य हे गरजू विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

कोरोनाकाळात राज ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी ५३ व्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई मनसेच्या वतीने 53 हजार घरांमध्ये मोफत पुस्तके संपूर्ण वर्षभर भेट देण्याचा संकल्प करण्यात आला होता. मराठी 100 पुस्तकांची यादीच मनसेने प्रसिद्ध केली होती. त्यामधील आपल्या आवडत्या पुस्तकाची नोंदणी करण्याचे आवाहन मनसेने केले होतं.

Raj Thackeray
Sanjay Raut's Allegation On BJP: आळंदीत औरंग्याची औलाद कशी निर्माण झाली ? ; वारकऱ्यांच्या हल्ल्यांवरुन राऊत संतप्त

राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणतात..

दर वर्षी १४ जूनला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात.

पण ह्यावर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की,कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. तुम्हाला अगदीच काही आणावंसं वाटत असेल तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसंच एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा. तुम्ही दिलेली झाडांची रोपं आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ. आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणाल ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान ठेवाल ह्याची मला खात्री आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com