cm eknath shinde pune Visit flood effected area Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द; मोदींची भेट टाळून मुख्यमंत्री पुरग्रस्तांच्या पाहणीसाठी पुण्याकडे रवाना...

Mangesh Mahale

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द झाला आहे. मुख्यमंत्री शिंदे पुण्यात येणार असून पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. अतिवृष्टीमुळे पुण्यात अनेक भागात नुकसान झाले आहेत, या भागातील नागरिकांशी मुख्यमंत्री संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. राज्यातील पाऊस आणि काही भागातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा तूर्तास लांबणीवर पडला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती होती. मात्र दिल्ली दौरा रद्द करीत ते पुण्यातील पुरपरिस्थितीचा आढावा घेणार आहेत. एकतानगर आणि काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती, अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. या ठिकाणी शिंदे भेट देणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल मध्यरात्री दिल्लीला जाणार होते. त्यांचा दौरा कोणत्या कारणासाठी नियोजित केला आहे, यावरही राजकीय वर्तुळात चर्चा होती. राज्यातील रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार हे कारण तर नाही ना, अशीची चर्चा सध्या सुरू आहे. त्यासाठी, मुख्यमंत्री शिंदे रविवारी रात्री दिल्लीत जाणार असल्याचे वृत्त होते.

विधानसभा निवडणुकांना अवघे 3 महिने राहिले असतानाही मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याने मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची अडचण झाली आहे, याबाबत ते चर्चा करणार असल्याचे समजते. पण आपला नियोजित दौरा रद्द करुन ते पुण्यात येत आहे.

पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांत पाऊस होत आहे. धरणांमधून पाणी विसर्ग करण्यास रविवारी सकाळपासून सुरुवात झाली. पानशेत धरणातून दुपारी चार वाजता १२ हजार ४३२ क्युसेकने; तसेच वरसगाव धरणातून १२ हजार ४५८ क्युसेकने पाणी सोडण्यात आले.

खडकवासल्यातून सकाळी नऊ वाजता २९ हजार ४१४ क्युसेकने पाणी विसर्ग करण्यास सुरुवात झाली. त्यात वाढ करून दुपारी ३५ हजारने आणि सायंकाळी पाच वाजता ४५ हजार ७०० क्युसेकने रात्री उशिरापर्यंत पाणी सोडण्यात येत होते.जिल्ह्यातील भाटघर, कळमोडी ही धरणेही १०० टक्के भरली.

खडकवासला प्रकल्पातून रविवारी सायंकाळी पाच वाजेपासून ४५ हजार ७०० क्युसेकने आणि जिल्ह्यातील अन्य धरणांच्या पातळीनुसार, विसर्ग करण्यास जलसपंदा विभागाने सुरुवात केली आहे.घाटमाथ्यावर काल (रविवारी) दिवसभर झालेल्या पावसामुळे प्रकल्पातील टेमघर धरण रविवारी १०० टक्के भरले. खडकवासला ९४ टक्के भरले आहे. उजनी धरण ९० टक्के आणि पुणे जिल्ह्यातील पवना, चासकमान, आंद्रा, नीरा देवघर, वीर, डिंभे ही धरणे ९० टक्क्यांपुढे भरली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT