CM Eknath Shinde
CM Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

CM Eknath Shinde : शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची आज बैठक; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार पक्षप्रमुख !

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल झाल्यानंतर आता मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना आज पहिली राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक ताज रेसिडन्स येथे पार पडणार आहे. या बैठकीत शिवसेनेची कार्यकारणीची निवड करण्यात येणार आहे. राष्ट्रीय नेते, उपनेते यांचीही निवड करण्यात येणार आहे. यामुळे आता नेतेपदी कोणाची निवड होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. (Shivsena News)

शिवसेना पक्षप्रमुख पदी एकनाथ शिंदे यांची निवड होणार हे खरं असलं तरी ती पक्ष प्रमुख ह पद स्विकारतात की मुख्य पक्ष नेता हे पाहणं महत्वाचं आहे. कार्यकारणीत दिल्लीतील संसदेतले मुख्यनेते पदाची निवड करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पक्षातील उपनेत्यांची निवड या कार्यकरणीत करण्यात येईल. पक्षाची पुढची वटचाल, अर्थसंकल्पीय अधिवेशन व निवडणुका यावरही चर्चा होईल.

शिंदे गटाची ही बैठक पार पडत असताना यावर उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून मात्र यावर कसली प्रतिक्रिया आलेली नाही. आधी बंड, त्यानंतर सत्तापालट, पक्षावर ताबा आणि आता पक्षप्रमुख पद ठाकरे यांच्याकडून निसटताना, ठाकरे गटाची भूमिका आणि त्यांची कायदेशीर पावले काय असतील, हे ही पाहणे महत्त्वाचे आहे. आता पक्षप्रमुख पदावर ही शिंदे विराजमान होत आहेत. ठाकरे गटांकडून सर्व काही निसटत असताना, त्यांच्याकडून ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT