jayant patil, Ekanath Shinde
jayant patil, Ekanath Shinde sarkarnama
मुंबई

जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा दणका ; 3000 कोटींच्या सिंचनाची कामे लटकणार

सरकारनामा ब्युरो

सांगली : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती दिली आहे. पर्यावरणवाद्यांच्या विरोधानंतर ठाकरे सरकार सत्तेवर येताच त्यांनी आरे कॉलनी येथील मेट्रो कारशेड प्रकल्पाला स्थगिती दिली होती. यानंतर नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm Ekanath Shinde) यांनी शपथ घेतल्यानंतर आरे मध्येच मेट्रोचे कारशेड होईल अशी घोषणा केली. (jayant patil news)

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच शिंदे सरकारने पहिला दणका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (chagan bhujbal) यांनी मंजुर केलेल्या कामांना स्थगिती दिली तर आता दुसरा दणका त्यांनी जयंत पाटलांना (jayant patil) दिला आहे.

सिंचन योजनांपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील सर्व गावात पाणी देण्याचा निर्णय तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या पुढाकाराने घेण्यात आला होता. त्यासाठी 3 हजार 858 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली होती. सुमारे 1 लाख 18 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार होते.

जलसंपदा विभागाकडून 3 हजार कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती त्याला तातडीने स्थिगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही कामे फक्त एका सांगली जिल्ह्यात होणार होती, जिल्ह्यातील 3000 कोटी रुपयांची सिंचनाची कामे लटकणार आहेत.

तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पुढाकार घेऊन सांगली जिल्हा दुष्काळमुक्त होण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. पाणी प्रत्येक गावांत पोहोचण्यासाठी 3 हजार 858 कोटी निधीची तरतूद केली. यात म्हैसाळ योजनेतून जत तालुक्यातील 64 गावांसाठी 6 टीएमसी पाणी देण्यात येणार होते. त्यातून 40 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT