कोलंबो : श्रीलंकेत (sri lanka) सध्या सरकार अस्तित्वात नाही, देशात संपूर्ण अराजक पसरले आहे. महागाईने आणि टंचाईने जनता होरपळली आहे. त्यामुळे सगळी जनता रस्त्यावर उतरली आहे. श्रीलंकेतील आर्थिक व राजकीय संकटाचा विरोध करणाऱ्या आंदोलकांनी शनिवारी पंतप्रधानांचे (prime minister) खासगी निवासस्थान पेटवून दिले. पोलिसांवर हे घर पेटवून दिल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. (sri lanka news update)
श्रीलंकन पोलिसांनी देशातील ढासळती कायदा सुव्यवस्था पाहून अनेक प्रांतात संचारबंदी लागू केली आहे. चीफ ऑफ डिफेंस स्टाफ यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे.
आंदोलनाच्या 116 दिवसांनंतर राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर कब्जा केला आहे. आंदोलकांनी शनिवारी रात्री पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांचे घर पेटवले. त्यानंतर विक्रमसिंघे यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.
श्रीलंकेला कर्जाच्या खाईत आणि आर्थिक संकटात लोटून पोबारा केलेले श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाय राजपक्षे यांचे अधिकृत निवासस्थान जनाधिपती मंदिरय्या मधून आंदोलकांना तब्बल दीड कोटी रुपयांची रोख रक्कम आढळली आहे. या रकमेची लूट न करता आंदोलकांनी ही रक्कम तेथील सुरक्षारक्षकांकडे सोपवली आहे. "जनतेचे लुटलेले पैसे जनतेला परत मिळाले," अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानात प्रवेश केल्यानंतर आंदोलकांनी तेथील या विविध खोल्यांचा ताबा घेतला. तिथल्या स्विमिंग पूल मध्ये पोहण्याचा आनंद घेतला. जनतेला वीज टंचाईचा सामना करायला लागतो. पण राजेप्रसादातले एसी चालू होते. काही लोकांनी ते एसी फोडून टाकले. त्याचवेळी एका दालनामध्ये तब्बल दीड कोटी रुपयांची रोख रक्कम आढळली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.