Ladki Bahin Yojana 2 Sarkarnama
मुंबई

Ladki Bahin Yojana : आयकर, परिवहन विभागाकडून छाननी, 22 हजार लाडक्या बहि‍णी अपात्र

CM Ladki Bahin Yojana Mumbai 22 thousand Income Tax Transport Department : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या छाननी महिला व बालकल्याण विभागाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी युद्धपातळीवर सुरू आहे. इतर सरकारी योजनांच्या लाभ घेतलेल्या महिला लाभार्थ्यांच्या अर्ज अपात्र ठरवले जात आहे.

मुंबईमधील लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी करताना, आयकर विभाग आणि परिवहन विभागाची मदत घेत, तब्बल 22 हजार महिलांचे अर्ज योजनेतून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना आता या योजनेचा लाभ आता मिळणार नाही.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) जानेवारीमधील हप्ता वितरीत करण्यात आला आहे. राज्यातील 2 कोटी 42 लाख पात्र लाभार्थी महिलांना सातवा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. परंतु या वैयक्तिक लाभाच्या योजनेमुळे अनेक विकास प्रकल्पांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे या योजनेंच्या लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननीचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून देखील राज्य सरकारने गोंधळ करून दिला आहे. त्यामुळे नेमकं कोणत्या निकषाखाली अर्जांची छाननी होत आहे, यावरून लाभार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. यातच मुंबईतील तब्बल 22 हजार लाभार्थ्यांना अपात्र ठरवत वगळण्यात आलं आहे.

मुंबईतील (Mumbai) लाभार्थ्यांनी इतर सरकारी योजनांचा लाभ, कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न, या निकषावर लाभार्थ्यांना अपात्र ठरवणे सुरू केलं आहे. या छाननीत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचे गैरप्रकारही उघडकीस आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सरकार कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे संकेत महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आले आहे.

ज्यांनी या योजनेचा लाभ मिळाला आहे, अशा सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची या महिन्यात, फेब्रुवारीत पडताळणी होणार आहे. काही लाभार्थी बहिणींनी पैसे नाकारण्यास सुरवात केली आहे. पण, याबाबत पैसे नाकारल्याचे अजून तरी अर्ज प्राप्त झालेले नाहीत, असे मुंबईतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

अपात्रचे काय असतील निकष

अडीच लाख रुपयांहून जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभा नाकारण्यात येणार आहे. स्वतःच्या नावे चारचाकी वाहने असेल, लग्नानंतर परराज्यात गेलेली महिला असेल, सरकारी सेवेत असणाऱ्या महिला इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. बँक खाते आणि आधार कार्डवर वेगवेगळे नाव असणाऱ्या महिला लाभार्थ्यांना देखील योजनेचा लाभ मिळणार नाही.

फेब्रुवारीअखेरपर्यंत पडताळणी...

अन्य योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून आधार कार्ड, बँक पासबुक, अन्य कागदपत्रे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. फेब्रुवारीअखेर त्याची पडताळणी होऊन कोणत्याही एका योजनेचा त्यांना लाभ घेता येणार आहे, तसेच नवीन अर्जाचीही काटेकोर पडताळणी केली जात आहे. मुंबईत संजय गांधी निराधार योजनेच्या 2 हजार 724 आणि महिला श्रावण बाळ योजनेच्या 1 हजार 127 लाभार्थी आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT