Love Jihad : मैट्रिमोनियल साइटवर खोटे माहिती देऊन 'लव जिहाद'; भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप, नेमकं काय आहे प्रकरण?

BJP Hindu women Pune Love jihad Muslims matrimonial sites : पुणे शहर तसेच जिल्ह्यामध्ये 'लव जिहाद'च्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, अनेक हिंदू मुली-स्त्रिया या फसवणुकीच्या प्रकारांना बळी पडत आहेत.
Love Jihad
Love JihadSarkarnama
Published on
Updated on

Pune News : मैट्रिमोनियल साइटवर खोटी माहिती देऊ महिलांची फसवणूक करण्यात येत आहे. या माध्यमातून पुणे शहर तसेच जिल्ह्यामध्ये 'लव जिहाद'च्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

अनेक हिंदू मुली-स्त्रिया या फसवणुकीच्या प्रकारांना बळी पडत आहेत. असा आरोप भाजपच्या नेत्या आणि माजी नगरसेविका मंजुषा नागपुरे आणि भाजप पुणे शहर महासचिव दीपक नागपुरे यांनी केली असून याबाबत, नुकतंच त्यांनी एक घटना उघडकीस आणली आहे.

याबाबत पत्रकार परिषद घेत त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. पुण्यातील (Pune) सिंहगड रस्ता परिसरातील एका 32 वर्षीय महिलेच्या बाबतीत नुकत्याच घडलेल्या मारहाणीच्या, फसवणुकीच्या तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याची घटना नागपुरे यांनी उघडकीस आणली आहे. पतीचा मित्र असलेल्या संबंधित व्यक्तीने पतीच्या निर्णयानंतर संबंधित महिलेच्या पतीच्या निधनानंतर मिळालेल्या भविष्यनिर्वाह निधीतील तसेच सोन्याचे दागिने, असे एकूण 32 लाखाहून अधिक रक्कम एका मुस्लिमाने व त्याच्या कुटुंबियांनी हडपल्याचे निदर्शनास आले आहे. पतीच्या निधनानंतर संबंधित महिलेचा विश्वास संपादन करून तसेच जवळीक साधून 'लव जिहाद'चा प्रयत्न केल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

Love Jihad
Namdev Shastri Maharaj : मराठा समाज आक्रमक, नामदेव शास्त्रींचा कीर्तनाचा कार्यक्रम करायला लावला रद्द

या संदर्भात माहिती देताना देताना भाजपच्या (Bjp) मंजुषा नागपुरे म्हणाल्या, "या घटनेतील आरोपी अकबर बहादूर शेख याने संबंधित महिलेच्या मनात सहानुभूती निर्माण करत तिच्याशी जवळीक वाढवली. जेव्हा संबंधित महिलेला या आरोपीच्या अन्य प्रकरणांची माहिती समजली, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे या महिलेच्या लक्षात आले. आरोपीकडून फसवणू‌क झलेल्या अन्य महिलांनीसु‌द्धा पुढे यावे, असे आम्ही आवाहन करत आहोत.

Love Jihad
Delhi Election 2025: निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच मुख्यमंत्री अडचणीत; निवडणूक आयोगाचा दणका

या स्त्रियांनी न घाबरता पुढे येऊन तक्रारी दाखल कराव्यात तसेच कायदेशीर मार्गाचा अवलंब करून फसवणूक करणाऱ्या परधर्मीय पुरुषांना धडा शिकवावा, असे आवाहन भाजपच्या माजी नगरसेविका मंजुषा नागपुरे तसेच भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर महासचिव दीपक नागपुरे यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

बदनामीमुळे गुन्ह्याची नोंदी कमी

दीपक नागपुरे म्हणाले, "पुणे शहर व जिल्ह्यातील 50 हून अधिक महिलांना 'लव जिहाद'च्या जाळ्यात खेचले गेल्याच्या तक्रारी गेल्या वर्षभरात आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. अनेक महिला भीतीपोटी तसेच समाजात बदनामी होईल या कारणास्तव तक्रार देण्यासाठी पुढाकार घेत नाहीत किंवा याबाबत कोणाशीही संवाद साधत नाहीत". त्यातून 'लव जिहाद'च्या अनेक घटनांची नोंद होऊ शकत नाही असे निदर्शनास आल्याचे दीपक नागपुरे यांनी सांगितले.

सहआरोपी करण्याचा इशारा

'अनेक मैट्रिमोनियल साईट तसेच वधू-वर सूचक मंडळांच्या सूचीमध्ये नोंदणी केलेल्या परधर्मीय पुरुषांनी बनावट कागदपत्रांचा आधार घेत खोटी माहिती सादर केल्याचेही निदर्शनास येत आहे. त्यामुळे अशा संस्था तसेच प्लॅटफार्म चालविणाऱ्या कंपन्यांनी परधर्मीय पुरुष-महिलांचे प्रोफाईल व त्यातील माहितीची पडताळणी योग्य पद्धतीने करावी. अन्यथा त्यांनाही 'लव जिहाद'च्या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी आम्ही करू', असा इशारा नागपुरे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com