Uddhav Thackeray

 

Sarkarnama 

मुंबई

मोठी बातमी : मुंबईकरांना मुख्यमंत्री ठाकरेंकडून नवीन वर्षाची भेट

Uddhav Thackeray : मुंबईतील ५०० चौ. फुटांपर्यतच्या घरांचा मालमत्ता कर माफ

सरकारनामा ब्युरो

मुंबई : नवीन वर्षाच्या मुहूर्तावर राज्य सरकारकडून मुंबईकरांना (Mumbai) मोठी भेट मिळाली आहे. यानुसार मुंबईतील ५०० स्केवर फूटांवरील घरांना करमाफी देण्यात आली आहे. नगरविकास खात्याच्या आज पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) या देखील ऑनलाईन बैठकीत उपस्थित होत्या. या बैठकीनंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

२०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने (Shivsena) आपल्या वचननाम्यात मुंबईतील ५०० चौ. फुटांपर्यतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यात येईल, असे वचन दिले होते. पुढे सत्तेत आल्यानंतर मुंबईतील निवासी इमारतींमधील ५०० चौरस फुटांपर्यंत चटई क्षेत्र असलेल्या निवासी सदनिकांचा मालमत्ता कर संपूर्णत: माफ करण्यात यावा, असा प्रस्ताव मुंबई महापालिकेने राज्य सरकारला पाठविला होता. त्यानंतर आज याबाबत घोषणा करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, मुंबईकर म्हणजे नुसते कर भरणारे नाही. दोन्ही हाताने सगळ्यांना पैसा देणारा हा मुंबईकर राज्याच्या विकास कामांमध्ये मोलाचे योगदान देतो. पण त्याला परत काय मिळतं हा खरा प्रश्न आहे. मतदानापूर्वी तारे तोडून आणण्याची भाषा करणारे नंतर पाच वर्षे काहीच बोलत नाहीत. शिवसेना हे असे अजिबात करत नाही. २०१७ ला जे निवडणूकीत शिवसेनेने जे वचन दिले ते पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, यातील बहूतांश वचने पूर्ण केली. आज एक महत्वाचे वचन या निर्णयाने पूर्ण होत आहे. ५०० चौ. फुटापर्यंतच्या घराच्या मालमत्ताकर माफ करणे हे महत्वाचे वचन आपण आज पूर्ण करत आहोत, असे त्यांनी घोषित केले.

दरवर्षी ३४० कोटींचा कर बुडणार

५०० चाैरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात माफी दिल्यामुळे आता महापालिकेचा दरवर्षी ३४० कोटींचा कर बुडणार आहे. मुंबईमध्ये ५०० चाैरस फुटांचे जवळपास १५ लाख घरे आहेत. यामध्ये २८ लाख कुटुंब राहतात. या सगळ्या कुटुंबियांना मोठा दिलासा सरकारकडून मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT