तुषार भोसलेंना काळं फासण्याचा प्रयत्न; भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

Tushar Bhosle यांनी काही दिवसांपुर्वी Sharad Pawar यांच्यावर वक्तव्य केले होते
Tushar Bhosle controversy

Tushar Bhosle controversy

Sarkarnama

Published on
Updated on

पंढरपूर : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पंढरपूरमध्ये भाजप (Bjp) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ncp) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातच दोन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Tushar Bhosle) यांना काळं फासण्याचाही प्रयत्न केला. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी अडवल्याने हा प्रकार टळला गेला. यानंतर परिसरात बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आचार्य तुषार भोसले यांनी काही दिवसांपुर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर वक्तव्य केले होते. त्यानंतर आज ते पंढरपूरमध्ये श्री. विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यास आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस काही कार्यकर्ते हातात अबिर बुक्का घेऊन मंदिरा जवळ आले होते. तुषार भोसले बाहेर येत असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुढे सरसावले. याच दरम्यान प्रसंगावधान राखत भोसले यांच्या दिशेने येत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांनी अडवले. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

<div class="paragraphs"><p>Tushar Bhosle&nbsp;controversy</p></div>
नव्या वर्षाच्या मुहूर्तावर काँग्रेसमध्ये मोठी खांदेपालट; नविन पदाधिकाऱ्यांची घोषणा

पुढे जाऊन भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते एकमेकांसोबत धराधरी करू लागले. त्यामुळे मंदिर परिसरात बराच वेळ गोंधळ आणि तणाव सुरू होता. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी ही केली. यावेळी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख म्हणाले, तुषार भोसले यांच्यासोबत अनेक पदाधिकारी होते. त्यावेळी गेटवर राष्ट्रवादीचे दोन भुरटे कार्यकर्ते होते. त्यांच्या हातात बुक्क्याच्या पुड्या होत्या. मात्र आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवले आणि अशा वर्तनाचा जाब विचारला. तसेच यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आम्ही जशाच तसे उत्तर देऊ असा इशारा दिला.

<div class="paragraphs"><p>Tushar Bhosle&nbsp;controversy</p></div>
OBC आरक्षणाशिवाय महापालिका निवडणुकांची शक्यता; मुंबई-औरंगाबादची रणधुमाळी लांबणीवर?

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर तालुका अध्यक्ष संदीप मांडवे म्हणाले, तुषार भोसले यांनी काही दिवसांपुर्वी माहिती नसताना शरद पवार यांच्यावर टीका केली होती. मात्र त्यांनी माहिती घेवून शरद पवार यांच्यावर बोलावे यासाठी आम्ही तुषार भोसले यांना शरद पवारांचे 'लोक माझे सांगाती' हे पुस्तक आणि फुटाणे भेट देण्यासाठी गेलो होतो. मात्र त्यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रस्ताळेपणा करुन घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी त्यात काही हप्त्यावरचे आणि दोन नंबरचे पदाधिकारीही होते असा आरोपही मांडवे यांनी केला.

तसेच आमचा त्यांना कोणतेही काळं फासण्याचा प्रयत्न नव्हता, लोकशाही मार्गानेच निषेध करत होतो. मात्र तरीही त्यांनी धक्काबुक्की केली. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही ही भाजपचा गोंधळ सहन करणार नसल्याचा इशारा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com