Omicron
Omicron Sarkarnama
मुंबई

राज्यावर ओमिक्रॉनचे सावट; मुख्यमंत्र्यांनी दिल्या महत्वाच्या सुचना

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : ओमिक्रॉन (Omicron) विषाणुच्या संसर्गाचा वेग अतिशय जास्त असून त्याला रोखण्यासाठी राज्यातील लसीकरण देखील वेगाने वाढले पाहिजे, यादृष्टीने जेथे लसीकरण कमी आहे. तिथे ते वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज (ता. ८) मंत्रिमंडळ बैठकीत दिले. राज्यात सध्या 12 कोटीं 3 लाख 18 हजार 240 डोसेस दिले आहेत. 4 कोटी 37 लाख 46 हजार 512 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. 7 कोटी 65 लाख 71 हजार 728 लोकांनी एक डोस घेतला आहे.

18 ते 44 वयोगटात 76.69 लोकांनी कमीत कमी 1 डोस तर 45 पेक्षा अधिक वयोगटातील 85. 25 टक्के लोकांनी एक डोस घेतलेला आहे. गेल्या 12 तासात संपूर्ण जगात ओमिक्रॉनच्या रुग्णात 45 टक्के वाढ झाली, असून 54 देशात याचा प्रसार झाला आहे. फ्रान्समध्ये दैनंदिन रुग्ण 40 हजारच्या पुढे आढळत आहेत. जर्मनीत ही संख्या 50 हजाराच्या आसपास आहे. ऑस्ट्रीयामध्ये देखील कोरोना सुरु झाल्यापासून सगळ्यात मोठी लाट आली असून दररोज 7 हजाराच्या आसपास नवीन रुग्ण आढळत आहेत.

अमेरिकेत देखील नोव्हेंबर 2020 सारखी परिस्थिती उद्भवली असून दररोज एक लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. दक्षिण आफ्रिकेत गेल्या 2 आठवड्यात नवीन रुग्णात मोठी वाढ झाली आहे. दररोज दुपटीने रुग्ण आढळत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील काळजी घेण्याची गरज असून आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळले गेलेच पाहिजे, यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात

1) नागपूर येथील राष्ट्रीय विधि विद्यापीठासाठी वारंगा (ता. जि. नागपूर) येथे विद्यार्थी वसतिगृह आणि इतर निवासी इमारती बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

2) कोरोना 19 पार्श्वभूमीवर स्वंय अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्यासाठी इरादा पत्राचा कालावधी वाढवणार आहे.

3) महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद या संस्थांचे विलीनीकरण करून महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

4) महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 मधील कलम- 2 (g) (iv) आणि सदर नि अधिनियमाच्या अनुसूची 1 च्या अनुच्छेद 25 (da)मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.

5) बाजार समित्या मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन अधिनियम 1963 मध्ये सुधारणा (पणन विभाग)

6) शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्थांमधून पदवी आणि पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये इंटर्नशिप करण्यास मंजूरी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT