Devendra Fadnavis, Sambhaji Bhide Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis News : संभाजी भिडेंवरुन विरोधकांचा विधानसभेत गदारोळ; फडणवीसांनी ठणकावून सांगितले

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे हे हिंदुत्वासाठी काम करतात. ते गडकिल्यांच्या संवर्धनासाठी झटतात; पण महापुरुषांविरोधात बोलण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला नाही. तसे त्यांनी बोलू नये, असे ठणकावून सांगत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) भिडेंची चौकशी होणार असल्याचे विधानसभेत जाहीर केले. त्यामुळे महात्मा गांधींबाबतचे आक्षेपार्ह विधान भिडेंना भोवण्याची दाट शक्यता आहे. भिडेंविरोधात गुन्हे दाखल झाले असले; तरीही अमरावती पोलिसांकडे त्याचे पुरेसे पुरावे नसल्याचेही फडणवीसांनी सांगितले.

आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी भिडे यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी विरोधकांनी विधानसभेत घोषणाबाजी केली. काँग्रेसच्या (Congress) आमदार आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्याला ट्वीटरवरुन धमकी आल्याचे विधानसभेत सांगितले. आपल्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास जबाबदार कोण असा सवाल त्यांनी केला. विरोधकांच्या मागणीनंतर फडणवीस यांनी संभाजी गुरुजी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, असे सांगितले. भिंडे यांचा उल्लेख फडणवीस यांनी गुरुजी असा केल्यामुळे विरोधकांनी पुन्हा गदारोळ केला. त्यावर त्यांचे नावच गुरुजी असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

फडणवीस म्हणाले, ''अमरावतीमध्ये राजापेठ पोलीस (Police) ठाण्यात भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भिडे यांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. त्यानुसार त्यांची चौकशी केली जाईल. अमरावतीमधील सभेचे व्हिडिओ उपलब्ध नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांचे जे व्हिडिओ माध्यमांमध्ये येत आहेत, ते वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. त्यामुळे पोलीस या अॅडिओची तपासणी करणार आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही एक तक्रार केली आहे. ठाणे पोलिसांनी ती तक्रार दाखल करून घेतली आहे. ही तक्रार अमरावती पोलिसांकडे पाठवली आहे. त्या तक्रारीसोबत जे संदर्भ आव्हाड यांनी दिले आहेत. त्याचा सुद्दा पोलीस तपास करीत आहेत.''

''कुठल्याही राष्ट्रीय नेत्याच्यासंदर्भात कुणीही अपमानजनक वक्तव्य केले तर त्यांच्यावर केस फाईल होईल. त्यांच्यावर पोलीस कारवाई होईल. संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्वसाठी काम करतात ते छत्रपती शिवाजी महाराजांशी त्यांच्या किल्ल्यांशी बहुजन समाजाला जोडतात हे कार्य चांगले आहे, पण तरीही त्यांना महापुरुषांवर अशा प्रकारचे वक्तव्य करण्याचा कुणीही अधिकार दिलेला नाही. त्यांनाच काय कुणालाही अशा प्रकारचा अधिकार नाही. त्यामुळे महापुरुषांवर कुणीही वक्तव्य केले तर त्यांच्यावर कारवाई होईल,'' असे फडणवीसांनी स्पष्ट केले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT