Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Sharad Pawar Maharashtra Daura: शरद पवार हे 'दगाबाजां'च्या होमपीचवर फिरणार; दौऱ्याचा धुरळा उडणार !

NCP News : शरद पवार आता पक्ष उभारण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढणार

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन-चार नव्हे; तर अडीच-पावणेतीन डझन आमदारांनी ‘दगा’ देऊन भाजपसोबत ‘घरोबा’ केल्यावरही न डगमगलेले या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आता पक्ष उभारण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. आठवड्याला दोन जिल्हे फिरून पवार हे १२-१५ विधानसभा मतदारसंघांत जाणार आहे.

फुटलेल्यांना निवडणुकीत गारद करण्याच्या हेतुने पवार जुन्या-जाणत्यांच्या भेटी घेऊन नवे राजकारण घडविणार असल्याचेही समजते. ऐन पावसाळ्यात निघणाऱ्या पवारांच्या दौऱ्याकडे साऱ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे. त्याचवेळी राज्यभर फिरताना पवारांच्या रडारवर कोण असेन, हेही दौऱ्यातून सगळ्यांपुढे येईल.

Sharad Pawar
Monsoon Session News : आमदार शिरसाट यांच्या विरोधातील परबांची सूचना उपसभापतींनी फेटाळली..

शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरणार असून ते आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरवात बीडमधून करणार आहेत. 17 ऑगस्टपासून पवारांचा हा दौरा सुरू होणार असून बीडनंतर ते उस्मानाबाद जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असणार आहेत. दर आठवड्याला दोन जिल्ह्यांचा दौरा पवार करणार आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर या दौऱ्याच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने पवारांचा प्रयत्न असणार आहे.

Sharad Pawar
Rohit Pawar T-Shirt: 'फक्त मुद्द्याचं बोलूया…' रोहित पवारांच्या टी- शर्ट 'लूक'ची विधानभवनात चर्चा

या दौऱ्याच्या माध्यमातून पवार आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघांचा आढावाही घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून याबाबत ते पक्षातील पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच पक्षात पडलेल्या फुटीनंतर काही ठिकणी ते नव्या नियुक्त्यांची घोषणा करण्याची शक्यता असल्याने पवारांच्या या दौऱ्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com