Rahul Gandhi - Narendra Modi Sarkarnama
मुंबई

Congress - BJP Politics : घराणेशाहीच्या नावाने बोंब मारणाऱ्या.. ; अर्थसंकल्पातील योजनांवरुन कॉंग्रेसचा आरोप

सरकारनामा ब्युरो

Congress - BJP News: घराणेशाहीच्या नावाने बोंब ठोकणाऱ्या भाजपाची राजेशाहीकडे वाटचाल चालली आहे, अशी टीका आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (९ मार्च) २०२३-२४ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील अनेक योजनांकडे लक्ष वेधत, आपला देश हा राजेशाहीकडे नेण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देश हुकूमशाहीच्या दिशेने नेत असल्याची टीका विरोधकांकडून कायमच होत असते. अशातच अर्थसंकल्पातील योजनांवरुन सचिन सावंत यांनी भाजपावर देश राजेशाहीच्या दिशेने जात असल्याचाही आरोप केला आहे. सचिन सावंत यांनी अर्थसंकल्पातल्या योजनांची नावं ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

"घराणेशाहीच्या नावाने बोंब ठोकत देश हळूहळू 'राजेशाही'कडे नेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. लांगूलचालनाची भाजपाशासित राज्य सरकारांची चढाओढ लागली आहे. गुजरात, कर्नाटकमध्ये मोदींच्या नावाने योजना आल्या, स्टेडियम झाले. आता महाराष्ट्र सरकारनेही हयातीतच मोदींचे नाव योजनांना दिले आहे. जे अगोदर इराक, उत्तर कोरिया , रशिया सारख्या काही देशात दिसले होते ते लवकरच सर्वत्र भारतात दिसेल असे वाटते.'' असे ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पात मोदी आवास घरकुल योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी, संत सेवालाल योजना, बिरसा मुंडा जोडरस्ते योजना आदी योजना सादर करण्यात आल्या. याशिवाय स्टेडियामलाही पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचं नाव देण्यात आल्याने काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या अर्थसंकल्पातील तरतुदींची नावं ट्विट करत सचिन सावंत यांनी आपला देश हा राजेशाहीकडे नेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे असा आरोप केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT