Congress Sarkarnama
मुंबई

NCP And Congress : महाविकास आघाडीत काँग्रेस आक्रमक; विरोधी पक्षनेते पदावर करणार दावा ?

NCP Crisis News : राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर काँग्रेसची सावध पावले

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Congress Meeting : महाविकास आघाडीतील शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठी गट रविवारी (ता. २ जुलै) राज्य सरकारमध्ये सहभागी झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्वात मोठा पक्ष असे मिरवणार राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला आहे. या पार्श्वभूमिवर काँग्रेसच्या गोटात जोरदार हलचाली सुरु झाल्या आहे. (Latest Political News)

राज्य काँग्रेसची आज मंगळवारी (ता. ४) बैठक होत आहे. दरम्यान, अजित पवार यांनी विरोध पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हे पद रिक्त झाले आहे. ज्या पक्षांचे जास्त आमदार त्या पक्षाचा विरोध पक्षनेता अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. त्यामुळे विधानभवन परिसरात होणाऱ्या या बैठकीत विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस दावा ठोकण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रभारी एच. के. पाटील आदी ज्येष्ठ नेते उपस्थित असणार आहे.

अजित पवार बाहेर पडल्याने महाविकास आघाडीला जोरदार झटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज्यात शिंदे-फडणवीस आले त्यावेळी महाविकास आघाडीकडून काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगितला होता. मात्र त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांना हे पद देण्यात आले होते.

आता पवार यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेस पुन्हा एकदा या पदावर दावा सांगण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसशी कशा प्रकारे समन्वय साधणार हेही पाहणे औत्सुक्याचे आहे.

राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. आजच्या बैठकीत त्यांची भूमिका स्पष्ट होणार आहे. अजित पवार भाजपसोबत गेल्याने राज्यातील काँग्रेसने सावध पावले उचलत असल्याचे दिसून येत आहे.

Edited by Sunil Dhumal

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT