Congress- Vanchit Bahujan Aaghadi : काँग्रेसची वंचित बहुजन आघाडीला युतीसाठी साद..?

Maharashtra Politics: महाविकास आघाडी मधील तिसऱ्या क्रमांकावर असलेली काँग्रेस आता पहिल्या क्रमांकावर आली आहे.
Congress- Vanchi Bahujan Aaghadi :
Congress- Vanchi Bahujan Aaghadi : Sarkarnama

Congress- Vanchit Bahujan Aaghadi : राज्यातील राजकीय भूकंपानंतर काँग्रेस अॅक्शन मोडवर आली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर आता महाविकास आघाडी मधील तिसऱ्या क्रमांकावर असलेली काँग्रेस आता पहिल्या क्रमांकावर आली आहे. मोदी लाटेमुळे गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस बॅकफूटवर गेली होती. पण आता काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यासोबत युती संदर्भात फोनवरून काँग्रेसचे सरचिटणीस के.सी वेणूगोपाल यांनी प्राथमिक चर्चा करून साद घातली आहे.

2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रातील ताकद सर्वांनीच पाहिली आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे सर्वात मोठा फटका काँग्रेसला (Cogress) पडला होता. त्यामुळे राज्यातील सध्याचे राजकीय वातावरण पाहता प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच काँग्रेस सरचिटणीस यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी फोनवर प्राथमिक युती संदर्भात चर्चा केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रतिसाद दिल्याची माहिती आहे.

Congress- Vanchi Bahujan Aaghadi :
Ajit Pawar News : अजित पवारांच्या कार्यालयासाठी दिलेल्या बंगल्याच्या चाव्या मिळेना; कार्यकर्त्यांनी कुलूपच तोडलं!

दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही बैठकीच्या काही फेऱ्या पार पडल्या असून आपली युती पुढे कशी नेता येईल याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र काही कारणांमुळे तसे होऊ शकले नाही.पण यावेळी काँग्रेसने स्वत:हून प्रकाश आंबेडकरांना फोन केल्याने वंचितचा महाविकास आघाडीतील प्रवेश होण्याची शक्यता पुन्हा वाढली आहे. यापूर्वी 1998 सालीही काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांशी युती केली होती.त्यावेळी प्रकाश आंबेडकर हे खासदार म्हणून निवडून आले होते. शिवाय त्यांच्या पक्षाचे 3 आमदारही त्यावेळी निवडून आले होते.

पण 2019 च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचा मोठा फटका बसला होता. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे काँग्रेसचे 20 ते 30 आमदार पडले होते. लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला तसाच फटका बसला.त्यावेळीही काँग्रेसचे अनेक खासदार वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार उभा असल्याने पराभूत झाले. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता वंचित बहुजन आघाडी काँग्रेस सोबत आल्यास पक्षाला मोठा फायदा होऊ शकतो, त्यामुळे दिल्ली हायकमांडने प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत युती संदर्भात प्राथमिक चर्चा सुरू केली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com