Congress Vs BJP  Sarkarnama
मुंबई

Congress Vs BJP : भाजपकडून सरकारी यंत्रणांचा पुन्हा गैरवापर, सचिन वाझेचा बोलविता धनी कोण? काँग्रेसने टायमिंग साधला

Pradeep Pendhare

Mumbai News : गंभीर गुन्ह्यात कैदेत असलेले निंलबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याने माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपानं राज्याच्या राजकीय वर्तुळात भूंकप आला आहे. पोलिस कोठडीत असलेल्या आरोपीला मीडियाशी बोलण्याची परवानगी नसते. मग सचिन वाझे याला मीडियाला बोलण्याची परवानगी कोणी दिली? याची चौकशी झाली पाहिजे.

तसेच सचिन वाझे याच्या बंदोबस्तात असलेल्या पोलिसांचे तत्काळ निलंबन झाले पाहिजे, अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. निलंबित पोलिस अधिकारी आणि सध्या कैदेत असलेले सचिन वाझे याच्या बोलवण्याच्या मागे कोणती शक्ती आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नसल्याची टिप्पणी अतुल लोंढे यांनी भाजपवर निशाणा साधला.

काँग्रेसचे (Congress) प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपवर निशाणा साधला. भारतीय जनता पक्ष यंत्रणांचा कसा गैरवापर करते हे आम्ही वारंवार उघड झाले आहे. मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमवीरसिंह यांच्या माध्यमातून भाजपने मविआ सरकारमधील नेत्यांवर खोटे आरोप केले. त्यांना वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गोवण्यासाठी षडयंत्र रचले. आताही माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि श्याम मानव यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलखोल केल्याने फडणवीस यांचा भ्रष्ट चेहरा उघडा पडल्याचा घाणाघात अतुल लोंढे यांनी केला.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या आरेपांमध्ये काहीतरी तथ्य आहे. त्यामुळे स्वतःला बोलता येत नाही. आपले बिंग फुटले म्हणून असत्य लपवण्यासाठी कैदेत असलेले सचिन वाझे याला पुढे करून भाजप नेते त्यांची खोटी कारस्थानं लपवत आहेत. परंतु सच झूक नही सकता, असे सांगून अनिल देशमुख यांच्या सत्याच्या लढ्यात त्यांच्या पाठिशी काँग्रेससह महाविकास आघाडी ठामपणे उभी आहे, असे अतुल लोंढे यांनी सांगितले.

भाजपचा (BJP) खोटा बुरखा फाटत चालला आहे. हे वारंवार उघड होत चालले आहे. समाजामध्ये भाजप खोटं पेरत गेले. आता तेच त्यांच्यावर उलटू लागले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल खोट्या गुन्ह्याखाली जेलमध्ये आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना देखील जेलमध्ये टाकले होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री नबाव मलिक हे सुद्धा जेलमध्ये होते. पण त्यांना मीडियाशी बोलण्याची परवानगी नव्हती. मग सचिन वाझे याला मीडियाशी बोलण्याची परवानगी कशी व ती कोणी दिली? सचिन वाझे सरकारचा कोण लागतो? आणि त्याला आताच का बोलावासे वाटले? असे अनेक प्रश्न अतुल लोंढे यांनी उपस्थित केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT